मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amitabh stock investment : अवघ्या ७५ रुपयांच्या या शेअरनं अमिताभ बच्चन यांना केलं मालामाल, तुमच्याकडंही आहे का?

Amitabh stock investment : अवघ्या ७५ रुपयांच्या या शेअरनं अमिताभ बच्चन यांना केलं मालामाल, तुमच्याकडंही आहे का?

Mar 04, 2024, 11:37 AM IST

  • Amitabh Bachchan investment in Stock Market : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना डीपी वायर्सच्या (DP Wires) शेअरनं मालामाल करून टाकलं आहे. 

अवघ्या ७५ रुपयांच्या शेअरनं अमिताभ बच्चन झाले करोडपती

Amitabh Bachchan investment in Stock Market : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना डीपी वायर्सच्या (DP Wires) शेअरनं मालामाल करून टाकलं आहे.

  • Amitabh Bachchan investment in Stock Market : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना डीपी वायर्सच्या (DP Wires) शेअरनं मालामाल करून टाकलं आहे. 

share market News update : बॉलिवूडमधील अनेक कलाकार शेअर बाजारातील गुंतवणुकीत रस घेतात. अनेक अभिनेते शेअर बाजारातून चांगले पैसेही कमावतात. महानायक अमिताभ बच्चनही (Amitabh Bachchan) त्यास अपवाद नाहीत. सात वर्षांपूर्वी अवघी ७५ रुपये किंमत असलेल्या एका शेअरनं अमिताभ यांना कोट्यधीश करून टाकलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

डीपी वायर्स (DP Wires) या कंपनीचा हा शेअर आहे. या कंपनीत अमिताभ यांची एक टक्क्यांपेक्षा अधिक भागीदारी आहे. अमिताभ यांच्या पोर्टफोलिओमधील हा प्रमुख शेअर आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीचा शेअर चांगलाच वधारला आहे. सध्या या शेअरची किंमत ५३५.२५ रुपये आहे.

१७ नोव्हेंबर २०२३ रोजी शेअरची किंमत ६७७.८० रुपयांवर गेली होती. डीपी वायर्सच्या शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक होता. मात्र, त्यानंतर प्रॉफिट बुकींग झाली आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये शेअर ४५२ रुपयांपर्यंत घसरला. हा शेअरचा मागच्या ५२ आठवड्यांचा नीचांक आहे.

अमिताभ यांच्याकडं किती शेअर्स?

अमिताभ बच्चन यांच्याकडं डीपी वायर्सचे २,९८,५४५ शेअर्स आहेत. कंपनीच्या एकूण शेअर्समध्ये हा वाटा १.९३ टक्के आहे. सप्टेंबरच्या तिमाहीशी तुलना केल्यास अमिताभ बच्चन यांनी आपली भागीदारी वाढवल्याचं दिसून येत आहे.

सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत डीपी वायर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, अमिताभ बच्चन यांच्याकडं कंपनीचे १,९९,३१० शेअर्स होते. हा वाटा कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या १.४७ टक्के इतका होता. यापूर्वी एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीत, अमिताभ बच्चन यांच्याकडं DP वायर्सचे २,८१,११२ शेअर्स होते. हा वाटा कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या २.०७ टक्के होता. याचाच अर्थ अमिताभ बच्चन वेळोवेळी या शेअरमध्ये प्रॉफिट बुक करत आल्याचं दिसतं. आता पुन्हा त्यांनी आपली भागीदारी वाढवली आहे.

प्रवर्तकांची भागीदारी किती?

डीपी वायर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रवर्तकांकडं ७४.७८ टक्के आणि सर्वसाधारण गुंतवणूकदारांकडं २५.२२ टक्के हिस्सा आहे. प्रवर्तकांपैकी आशादेवी कटारिया यांच्याकडं सर्वाधिक ६७,७८,८९३ शेअर्स आहेत. हा वाटा ४३.७३ टक्के आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची व्यक्तिगत आहेत. त्याच्याशी हिंदुस्तान टाइम्स मराठी सहमत असेलच असं नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

पुढील बातम्या