Vivo X Fold 3: स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो त्यांचा फोल्डेबल फोन विवो एक्स फोल्ड ३ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सुपरफास्ट चार्जिंगसह बाजारात दाखल होणारा हा फोन जगातील सर्वात पातळ आणि हलका फोन असेल, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. या आगामी फोनला चीनच्या ३ सी सर्टिफिकेशन साइटवर पाहिला पाहण्यात आले आहे. यामुळे हा फोन लवकरच चीनमध्ये लॉन्च होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विवो स्मार्टफोनचा मॉडेल क्रमांक व्ही२३०३ए आहे, ज्याची खात्री फोनच्या ३ सी सर्टिफिकेशनने केली आहे. यापूर्वी स्मार्टफोनचा मॉडेल क्रमांक Weibo वर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने उघड केला. त्यानुसार, हा स्मार्टफोन ८० वॅट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह बाजारात दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल, याची देखील खात्री सर्टिफिकेशन करते. याव्यतिरिक्त स्मार्टफोनबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आली नाही.
चीनी स्मार्टफोन ब्रँड विवो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरसह विवो एक्स फोल्ड ३ स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. हा स्मार्टफोन लाइटवेट बॉडीसह बाजारात सर्वात पातळ फोल्डेबल म्हणून लॉन्च केला जाणार आहे. अलीकडेच टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने Weibo वर स्मार्टफोनचे डिझाइन स्कीमॅटिक्स शेअर केले आहेत.
या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ग्राहकांना स्मार्टफोनमध्ये अल्ट्रावाइड आणि टेलिफोटो सेन्सरसाठी ५० मेगापिक्सेल सेन्सर देखील देण्यात येतील अशी माहिती आहे.