मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Air India News : एअर इंडियाचे 'टेक ऑफ' अजूनही अडचणीत, पुढील वर्षी होणार संपूर्ण कार्यन्वित

Air India News : एअर इंडियाचे 'टेक ऑफ' अजूनही अडचणीत, पुढील वर्षी होणार संपूर्ण कार्यन्वित

Oct 15, 2022, 03:38 PM IST

  • Air India news : टाटा समुहात पुन्हा गेल्यावर एअर इंडियाची सेवा संपूर्णपणे कार्यन्वित होण्यासाठी अजूनही एक वर्षांचा कालावधी लागणार आहे. कारण ही कंपनी अद्याप टॅक्सिंग फेजमध्ये असून बड्या गुंतवणूकदाराच्या शोधात आहे. 

air india HT

Air India news : टाटा समुहात पुन्हा गेल्यावर एअर इंडियाची सेवा संपूर्णपणे कार्यन्वित होण्यासाठी अजूनही एक वर्षांचा कालावधी लागणार आहे. कारण ही कंपनी अद्याप टॅक्सिंग फेजमध्ये असून बड्या गुंतवणूकदाराच्या शोधात आहे.

  • Air India news : टाटा समुहात पुन्हा गेल्यावर एअर इंडियाची सेवा संपूर्णपणे कार्यन्वित होण्यासाठी अजूनही एक वर्षांचा कालावधी लागणार आहे. कारण ही कंपनी अद्याप टॅक्सिंग फेजमध्ये असून बड्या गुंतवणूकदाराच्या शोधात आहे. 

Air India News : एअर इंडियाच्या ताफ्यात सध्या लहान आकाराची ७० विमाने आहेत. त्यापैकी ५४ विमाने कार्यरत आहेत तर उर्वरित 16 विमाने पुढील वर्षाच्या सुरूवातीस हळूहळू सेवेत दाखल होतील. त्याच वेळी, मोठ्या आकाराच्या एकूण ४३ विमानांपैकी ३३ विमाने सध्या कार्यरत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

एअऱ इंडियाची टॅक्सिंग फेज अद्यापही सुरुआहे. त्यामुळे कंपनी विस्तारीकरणासाठी कोणत्यातरी बड्या गुंतवणूकदराच्या शोधात आहे. एअर इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीईओ) विनोद हजमाडी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की एअरलाइन सध्या "टॅक्सिंग फेज" मध्ये आहे आणि वाढीच्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागेल. या वर्षी टाटा समुहाने जानेवारीत एअर इंडिया सरकारडून खरेदी केली. त्यानंतर तोट्यात चाललेल्या कंपनीचा कायापालट करण्यासाठी सर्वसामावेशक योजना आणली.

नवी दिल्ली येथे आयोजित 'एव्हिएशन इन्शुरन्स सिम्पोजियम 2022' ला संबोधित करताना, हजमाडी म्हणाले की भूतकाळात एअर इंडियाने एव्हिशन क्षेत्रात आपला ठसा उमटवला. पण आता सरकारकडून पुन्हा टाटा समुहाकडे आल्यावर प्रगतीच्या वाढीचा वेग गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या कंपनी टॅक्सिंग फेजमध्ये आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या चूका दुरुस्त करुन मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याची वेळ आहे. एअर इंडियाचा पुन्हा संपूर्ण क्षमतेने टेक आॅफ करण्यासाठी अजूनही दोन वर्षांचा कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅक्सिंग फेज म्हणजे काय ?

सर्वसामान्य लोकांसाठी टॅक्सिंग फेज म्हणजे करआकारणी असा समज होऊ शकतो. पण एव्हिएशन क्षेत्रात टॅक्सिंग फेजचा अर्थ वेगळा आहे. विमानतळांवर उभ्या असलेल्या विमानांच्या एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची प्रक्रिया म्हणजे टॅक्सिंग फेज होय. मात्र यात टेकऑफपूर्वी धावपट्टीवर विमाने धावण्याच्या प्रक्रियेचा त्यात समावेश नाही.

ही उदिष्ट्ये साध्य करण्यासाठी एअर इंडियाला तंत्रज्ञानस डिजीटायझेशन आणि मनुष्यबळ वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागणार आहे.त्यासाठी बड्या गुंतवणूकदारांची गरज आहे. किंबहुना पुढील सव्वा वर्षांच्या कालावधीपर्यंत एअर इंडिया बोईंग रुंद आकाराची पाच विमाने आणि एअरबसची २५ लहान आकाराची विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहेत.

 

विभाग

पुढील बातम्या