मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market updates : एक बातमी काय आली, अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर रॉकेटच्या वेगाने झेपावले!

stock market updates : एक बातमी काय आली, अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर रॉकेटच्या वेगाने झेपावले!

Nov 28, 2023, 02:13 PM IST

  • Adani group shares price news : अदानी समूहावर हिंडनबर्गनं केलेले आरोप कोणत्याही चौकशीशिवाय सत्य मानण्याची गरज नसल्याचं मत न्यायालायनं नोंदवल्याचा थेट परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.

Adani group share price surged

Adani group shares price news : अदानी समूहावर हिंडनबर्गनं केलेले आरोप कोणत्याही चौकशीशिवाय सत्य मानण्याची गरज नसल्याचं मत न्यायालायनं नोंदवल्याचा थेट परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.

  • Adani group shares price news : अदानी समूहावर हिंडनबर्गनं केलेले आरोप कोणत्याही चौकशीशिवाय सत्य मानण्याची गरज नसल्याचं मत न्यायालायनं नोंदवल्याचा थेट परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.

Adani group shares surged : मागील तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा सुरू झालेल्या शेअर बाजारानं अदानी समूहाला व त्यांच्या गुंतवणूकदारांना गुडन्यूज दिली आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. हिंडनबर्गच्या आरोपांच्या संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवल्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

२०२३ च्या पहिल्याच महिन्यात हिंडनबर्ग रिसर्च संस्थेनं एक अहवाल प्रसिद्ध करून अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. अदानी समूह शेअरच्या किंमती कृत्रिमरित्या फुगवून गुंतवणूकदारांची फसवणूक करतो, असा आरोप हिंडनबर्गच्या अहवालातून करण्यात आला होता. त्यामुळं एकच खळबळ उडाली होती. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स कमालीचे घसरले होते. 

Adani on tunnel collapse : अदानींच्या कंपनीमुळं उत्तराखंडमधील बोगद्यात अडकले ४१ मजूर? नेमकं सत्य काय?

हिंडनबर्गच्या या आरोपांनंतर अदानी समूहाच्या चौकशीची मागणी होऊ लागली. राजकीय नेत्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी चौकशीसाठी जोर लावला. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं होतं. त्यानंतर न्यायालयानं सेबीला चौकशीचे आदेश दिले होते. सेबीनं शुक्रवारी आपलं म्हणणं मांडलं व चौकशीसाठी आम्हाला आणखी मुदतीची गरज नसल्याचं न्यायालयात स्पष्ट केलं. 

'चौकशीआधीच हिंडनबर्गचा अहवाल सत्य मानण्याची गरज नाही. न्यायालयानं नेमलेल्या चौकशी समितीवर याचिकाकर्त्यांना विश्वास ठेवावा लागेल, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. तसंच, या संदर्भातील याचिकांवरील निर्णय राखून ठेवला. 

शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ

न्यायालयाच्या या निरीक्षणामुळं अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला. त्याचे सकारात्मक पडसाद आज बाजारात पाहायला मिळत आहेत. अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स ११ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. अदानी टोटल गॅसचे शेअर्स जवळपास २० टक्क्यांनी वाढले आहेत. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स जवळपास १४ टक्क्यांनी वाढले आहेत, तर अदानी पॉवरच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

अदानी विल्मरचे शेअर्स १० टक्क्यांनी वाढले असून अदानी पोर्ट्सचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. अदानी समूहाच्या इतर कंपन्यांपैकी एनडीटीव्हीच्या शेअरची किंमत सुमारे १२ टक्क्यांनी वाढली आहे.  अंबुजा सिमेंटच्या शेअरची किंमत ४ टक्क्यांनी तर, एसीसीच्या शेअरची किंमत ४ टक्क्यांहून वाढली आहे.

himalayan 450 launch : रॉयल एनफ्लिडचा दणदणीत अवतार 'हिमालयन ४५०' अखेर बाजारात, काय आहे खास? वाचा

तिमाही निकालांकडं लक्ष

अदानी समूहाच्या १० पैकी ७ सूचीबद्ध कंपन्यांच्या निव्वळ नफ्यात चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतमध्ये वाढ झाली आहे. सिमेंट आणि बांधकाम साहित्य क्षेत्रातील प्रमुख असलेल्या अंबुजा सिमेंट्सनं अदानी ग्रुपमध्ये सर्वात चांगली कामगिरी नोंदवली आहे. या कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल १,८३५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

विभाग

पुढील बातम्या