मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: एन्डोमेट्रिऑसिस म्हणजे काय? जाणून घ्या याची लक्षणे आणि उपचार

Video: एन्डोमेट्रिऑसिस म्हणजे काय? जाणून घ्या याची लक्षणे आणि उपचार

Mar 28, 2024, 07:32 PMIST

  • मासिक पाळीच्या काळात शरीराबाहेर टाकले जाणारे गर्भाशयाचं अस्तर म्हणजे एन्डोमेट्रिअम. अशाप्रकारचं अस्तर जेव्हा अंडाशयाभोवती आढळतं, तेव्हा त्या स्थितीला एन्डोमेट्रिऑसिस म्हटलं जातं.जगभरात १० पैकी १ स्रीला एंडोनेट्रोसिसचा त्रास असतो. मासिक पाळीच्या वेळी असह्य वेदना होणे, सेक्सदरमान किंवा सेक्सनंतर होणाऱ्या वेदना,ओटीपोटात अतिशय वेदना होणे, नैसर्गिक गर्भधारणेत अडथळे, मासिक पाळी दरम्यान शौचाला अथवा लघवीला त्रास अशी त्याची लक्षणे आहेत. प्रत्येक स्त्रीचं दर महिन्याला गर्भशयातील अस्तर वाढतं, जर स्त्रीबीज फलित झालं तर ते त्या गर्भाशयाच्या अस्तराला चिकटून तिथे गर्भधारणा होऊ शकते. तसेच जर गर्भधारणा नाही झाली तर त्या स्त्रिला मासिक पाळी येते आणि ते अस्तर त्याद्वारे बाहेर पडतं. मात्र, एन्डोमेट्रिऑसिसची समस्या असणाऱ्यांमध्ये एन्डोमेट्रीयल पेशींचं अस्तर शरीरातील एखाद्या दुसऱ्या भागात असू शकतात. अशा परिस्थितीत या पेशी अंडाशय, आतडे, गुदाशय, मूत्राशय, पेल्विक भागात किंवा ओटीपोटीच्या आतील पोकळीमध्ये असण्याची शक्यता असते. फेलोपियन ट्यूबमधून अंडाशयातील स्त्रीबीज गर्भाशयात प्रवास करत असतात. मात्र, फेलोपियन ट्यूबच्या अवतीभवती एन्डोमेट्रीयमचे अस्तर वाढल्यानं, स्त्रीबीज गर्भाशयात जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो.