मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : आरक्षणाबाबत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं विधान, म्हणाले…

Video : आरक्षणाबाबत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं विधान, म्हणाले…

Sep 07, 2023, 02:23 PMIST

Mohan Bhagwat on Reservation : आपल्याकडील समाजव्यवस्थेनं काही घटकांना वर्षानुवर्षे मागास ठेवलं. त्यांना बरोबरीचे हक्क दिले नाहीत. जवळपास दोन हजार वर्षे हे सुरू होतं. त्यांना आता पुन्हा आपल्या बरोबरीत आणण्यासाठी काही विशेष उपाय गरजेचे आहेत. आरक्षणाचा उद्देश हाच आहे. कुटुंबात सगळे समान असतात. मात्र, आजारी असलेल्या माणसाची काळजी जास्त घेतली जाते. तसंच आरक्षणाच्या बाबतीत आहे. त्यामुळंच देशाच्या राज्यघटनेनं घालून दिलेल्या आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा आहे, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.