मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : मुंबई-नाशिक रस्त्यावरील वाहतूक कोंडी कधी फुटणार?; सरकार म्हणतं…

Video : मुंबई-नाशिक रस्त्यावरील वाहतूक कोंडी कधी फुटणार?; सरकार म्हणतं…

Jul 25, 2023, 04:06 PMIST

Balasaheb thorat on Mumbai Nashik Highway traffic video : नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज सरकारला चांगलंच धारेवर धरलं. आमदार रईस शेख यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळं बाळासाहेब थोरात यांचं समाधान झालं नाही. त्यांनी याबाबत सरकारला जाब विचारला. मुंबई-नाशिक रस्ता हा वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. तरीही ऑगस्ट २०२४ पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, असं सरकार सांगतं. हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचं उत्तर आहे. नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीनं मार्ग काढा, अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली.