मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : भ्रष्टाचाऱ्यांना, गुंडांना साथ आणि मित्रांचा विकास… उद्धव ठाकरे कडाडले!

Video : भ्रष्टाचाऱ्यांना, गुंडांना साथ आणि मित्रांचा विकास… उद्धव ठाकरे कडाडले!

Feb 05, 2024, 03:15 PMIST

Uddhav Thackeray Rajapur Speech Video : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा सध्या कोकणात सुरू आहे. सिंधुदुर्ग नंतर आज उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील राजापूरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. माझ्या वडिलांनी संकटाच्या काळात मोदींना मदत केली, त्याच मोदींनी आमची शिवसेना चोरायला चोरांना मदत केली. चोराला मुख्यमंत्री म्हणून बसवला. माझ्या लोकांच्या मागे लागले आहेत. आम्ही तुमची लफडी काढली तर त्यांच्यावर कारवाई करणार का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. भ्रष्टाचाऱ्यांची साथ, गुंडांना साथ आणि मित्रांचा विकास... ही नवी घोषणा भाजपची आहे का, असा सवालही त्यांनी केला.