मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : उद्धव ठाकरे यांचा मोदी-अदानी मैत्रीवर निशाणा, म्हणाले…

Video : उद्धव ठाकरे यांचा मोदी-अदानी मैत्रीवर निशाणा, म्हणाले…

Sep 01, 2023, 06:09 PMIST

Uddhav Thackeray in India alliance Meet : मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर सर्व नेत्यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. शिवसेना (बाळासाहेब उद्धव ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. इतकी वर्षे लूट केली आणि आता निवडणुका आल्या की सिलिंडरवर सूट देतायत. हे सगळं लोकांना समजलंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सबका साथ, सबका विकास असं म्हणणारे सत्तेवर आल्यानंतर सर्वांना लाथ आणि आपल्या मित्रांचा विकास हेच यांचं धोरण राहिलंय. मित्रांचं भलं करण्याचा उद्योग सुरू आहे. हा मित्र परिवारवाद आम्ही चालू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.