मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Modi targets Shiv Sena : नरेंद्र मोदींचे ठाकरेंच्या शिवसेनेवर बाण, शिंदेंचं गुणगाण; पाहा Video

Modi targets Shiv Sena : नरेंद्र मोदींचे ठाकरेंच्या शिवसेनेवर बाण, शिंदेंचं गुणगाण; पाहा Video

Jan 20, 2023, 10:29 AMIST

PM Modi on Shiv Sena and BMC : विविध विकासकामांचा शुभारंभ व मेट्रो मार्गांचे लोकार्पण करण्याच्या निमित्तानं मुंबईत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीकेसी येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार टीका केली. मुंबईच्या पैशांचा योग्य वापर करणारे लोक महापालिकेत हवेत. लोकांचा पैसा भ्रष्टाचारात घालवणारे, बँकेत ठेवणारे आणि विकासकामांत राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीचे लोक महापालिकेत नको, असं म्हणत पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर तोंडसुख घेतलं. दिल्ली, महाराष्ट्र आणि मुंबईत एकच व्यवस्था यावी यासाठी मुंबईकरांनी प्रयत्न करावेत, असं सांगत, महापालिकेत भाजपची सत्ता आणण्याचं आवाहनही अप्रत्यक्षपणे त्यांनी यावेळी केलं.