मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : एनडीएच्या बैठकीत मोदींनी दोनदा केला बाळासाहेबांचा उल्लेख, म्हणाले…

Video : एनडीएच्या बैठकीत मोदींनी दोनदा केला बाळासाहेबांचा उल्लेख, म्हणाले…

Jul 19, 2023, 02:06 PMIST

PM Modi mention Balasaheb Thackeray : आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडं विरोधी पक्षांची दुसरी बैठक बेंगळुरूत पार पडली, तर दुसरीकडं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकी प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी घटक पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडीत आजवर योगदान दिलेल्या सर्वच राजकीय पक्षांचे व त्यांच्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा मोदींनी दोनदा उल्लेख केला. बाळासाहेबांचे सच्चे अनुयायी आजही एनडीएसोबत आहेत, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीला उपस्थित होते.