मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : माझं वय काढू नका! हा गडी थांबणार नाही; शरद पवारांची जोरदार फटकेबाजी

Video : माझं वय काढू नका! हा गडी थांबणार नाही; शरद पवारांची जोरदार फटकेबाजी

Apr 08, 2024, 02:50 PMIST

Sharad Pawar Speech Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. उंडवडी कडेपठार इथं झालेल्या या सभेत शरद पवारांनी मोठ्या आत्मीयतेनं ग्रामस्थांशी संवाद साधला. विरोधकांकडून शरद पवार यांच्या वयाचा वारंवार उल्लेख केला जात आहे. त्यावरून शरद पवारांनी मिश्किल शब्दांत फटकेबाजी केली. हे ८४, ८०, ८५ काढू नका. तुम्ही काय बघितलंय मला. हा गडी थांबणार नाही. ज्या लोकांनी माझी साथ दिलीय, त्यांची साथ सोडणार नाही. त्यांच्या हिताची जपणूक करणारच, असा निर्धार शरद पवार यांनी बोलून दाखवला.