मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Aero India Show Video : हवाई दलानं 'असं' जिंकलं हृदय, पाहा व्हिडिओ

Aero India Show Video : हवाई दलानं 'असं' जिंकलं हृदय, पाहा व्हिडिओ

Feb 13, 2023, 05:07 PMIST

Aero India Show 2023 Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियातील सर्वात मोठा एअर शो 'एअरो इंडिया-२०२३' चं उद्घाटन केलं. हा एअर शो १७ फेब्रुवारी पर्यंत बेंगळुरू येथील हवाई दलाच्या येलहंका विमानतळावर होणार आहे. एरो इंडिया शोचं हे १४ वं वर्ष आहे. हवाई दलाच्या 'सूर्यकिरण' विमानांनी यावेळी थरारक प्रात्यक्षिकांच्या साहाय्यानं आकाशात हृदयाचा आकार साकारला. 'एरो इंडिया' हे भारताच्या वाढत्या क्षमतेचं उत्तम उदाहरण आहे. या शोला १०० देशांची उपस्थिती असणं हा भारतावर जगाच्या वाढत असलेल्या विश्वासाचं द्योतक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.