मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : सनातन धर्माच्या आधारेच जग चाललंय; मोहन भागवत यांचा दावा

Video : सनातन धर्माच्या आधारेच जग चाललंय; मोहन भागवत यांचा दावा

Oct 12, 2023, 06:53 PMIST

Mohan Bhagwat speech on sanatan dharma : सनातन धर्माच्या आधारेच हे जग चालत आलंय, चालू आहे आणि चालू राहील. सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करणं म्हणजे आपल्याचा पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. सनातन धर्म राहील, कुऱ्हाड मारणाऱ्याचा पाय जाईल, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हरयाणातील रोहतक इथं नुकतंच केलं. 'सनातन धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांची आम्हाला कीव येते. त्यांचा राग येत नाही. कारण अशी वक्तव्यं अज्ञानातून येतात. सनातन धर्माचं रक्षण कसं करायचं हे संतांनी सांगितलंय, असंही भागवत म्हणाले.