मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: एमसी स्टॅन का जिंकला ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी? शिव ठाकरेने दिलं उत्तर!

Video: एमसी स्टॅन का जिंकला ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी? शिव ठाकरेने दिलं उत्तर!

Feb 13, 2023, 04:20 PMIST

  • Bigg Boss 16 Contestant Shiv Thakare: लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १६’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. या शोमध्ये रॅपर एमसी स्टॅन याने विजेतेपद पटकावले आहे. शोच्या महाअंतिम सोहळ्यापर्यंत विजेत्यांच्या नावात कुठेही एमसी स्टॅनचे नाव समोर आले नव्हते. मात्र, ऐनवेळी विजेतेपदाची माळ त्याच्या गळ्यात पडली. एमसी स्टॅनला ट्रॉफी मिळताच शिव ठाकरे सगळ्यात जास्त खूश झाला आणि त्याने आनंदाने एमसी स्टॅनला मिठी मारली. एमसी स्टॅन बिग बॉस १६ची ट्रॉफी का जिंकला, याचं उत्तर देखील शिव ठाकरेने दिलं.