मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : रामदास कदम व त्यांच्या मुलांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप; अनिल परब यांनी कागदपत्रंच दाखवली

Video : रामदास कदम व त्यांच्या मुलांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप; अनिल परब यांनी कागदपत्रंच दाखवली

Apr 02, 2024, 02:28 PMIST

Anil Parab allegations on Ramdas Kadam : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. रामदास कदम यांनी आपल्या पदांचा गैरवापर करून खेड नगरपालिकेचा भूखंड हडपल्याचा आरोप त्यांनी केला. या गैरव्यवहाराची कागदपत्रंच अनिल परब यांनी दाखवली. तसंच, खेडमधील जांबुर्डे गावात जमीन भूसंपादन करण्यात आलं. रामदास कदम यांच्या मुलांची गावात १५ गुंटे जागा होती. ह्यांनी सरकारकडून १८.५ गुंट्याचा मोबदला वसूल केला. तोच प्लॉट एनए करण्याची परवानगी त्यांनी मागितलीय. भूसंपादन झालेली जमीन एनए करण्याची परवानगी कशी काय मागितली जाऊ शकते,' असा सवाल अनिल परब यांनी केला. येत्या काही दिवसांत आणखी १२ ते १३ घोटाळे उघड करेन, असा इशाराही परब यांनी केला.