मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: शहनाज गिलने हॉस्पिटलमधून साधला संवाद; व्हिडीओ पाहून चाहते पडले काळजीत!

Video: शहनाज गिलने हॉस्पिटलमधून साधला संवाद; व्हिडीओ पाहून चाहते पडले काळजीत!

Oct 10, 2023, 01:39 PMIST

Shehnaaz Kaur Gill: अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील शहनाजच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. दरम्यान, अचानक तिला रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच चाहत्यांना धक्काच बसला आहे. शहनाज गिलला अन्नातून विषबाधा झाली असून, त्यामुळे तिची प्रकृती खालावली आहे. या संसर्गामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तिने हॉस्पिटलमधून चाहत्यांशी संवाद साधला.