मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video:साऊथ स्टार अल्लू अर्जुन ठरला राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला तेलुगू कलाकार!

Video:साऊथ स्टार अल्लू अर्जुन ठरला राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला तेलुगू कलाकार!

Aug 25, 2023, 12:10 PMIST

Allu Arjun: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसाठी ‘पुष्पा’ हा चित्रपट अतिशय खास ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले होते. पण, त्यानंतर आता या चित्रपटाच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला आहे, जो आतापर्यंत कोणत्याच साऊथ चित्रपटाने केला नव्हता. अनेक तेलुगू चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, आजपर्यंत एकाही तेलुगू अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता. आता अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारानंतर अभिनेत्याच्या घरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.