मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Bajrang Punia : लगेच 'पद्मश्री' स्वीकारणार नाही, बजरंग पुनियानं स्पष्टच सांगितलं

Bajrang Punia : लगेच 'पद्मश्री' स्वीकारणार नाही, बजरंग पुनियानं स्पष्टच सांगितलं

Dec 25, 2023, 11:45 AM IST

  • Wrestlers Protest : कुस्ती महासंघाच्या बरखास्तीनंतर संजय सिंह यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तर कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही महिला कुस्तीपटूंना न्याय मिळाल्यावरच 'पद्मश्री' स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे.

Wrestlers Protest (PTI)

Wrestlers Protest : कुस्ती महासंघाच्या बरखास्तीनंतर संजय सिंह यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तर कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही महिला कुस्तीपटूंना न्याय मिळाल्यावरच 'पद्मश्री' स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे.

  • Wrestlers Protest : कुस्ती महासंघाच्या बरखास्तीनंतर संजय सिंह यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तर कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही महिला कुस्तीपटूंना न्याय मिळाल्यावरच 'पद्मश्री' स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे.

Bajrang Punia Not Take Back Padmashree : भारतीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी (२४ डिसेंबर) मोठा निर्णय घेतला. त्यांनी नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. खेळाडूंच्या विरोधामुळे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

कुस्ती संघटनेच्या निलंबनानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला या खेळाशी संबंधित काम पाहण्यासाठी एक अॅडहॉक समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. पुन्हा निवडणूक होऊन नव्या अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत ही समिती भारतीय कुस्तीपटूंशी संबंधित सर्व निर्णय घेईल.

याआधी २१ डिसेंबर रोजी कुस्ती संघटनेची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत संजय सिंह निवडून आले आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले. यानंतर वर्षभरापासून सुरू असलेला वाद आता संपुष्टात येईल, असे मानले जात होते. पण तसे झाले नाही. संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील कुस्ती संघटनेलाही भारतीय कुस्तीपटूंनी विरोध केला. 

दरम्यान, निलंबनानंतर संजय सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, “आम्ही क्रीडामंत्र्यांकडे वेळ मागितला असून निलंबन मागे घेण्याची विनंती करणार आहोत. चर्चा करूनही प्रश्न सुटला नाही तर आम्ही कायदेशीर पर्यायांचाही विचार करू शकतो. आम्ही सर्व निर्णय नियमांनुसार घेतले आहेत. याचे पुरावेही त्यांच्यासमोर सादर करू. सर्व निर्णय एकमताने घेतले आहेत. हे मी एकट्याने घेतलेले निर्णय नाहीत. आमच्याकडे सर्व काही लिखित स्वरूपात आहे.”

चांगले होण्याच्या दिशेने पहिले पाऊल- साक्षी

नव्या कुस्ती महासंघाच्या बरखास्तीनंतर कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, हे काहीतरी होण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. आम्ही कोणत्या हेतूने लढत आहोत हे आता सरकारला समजेल अशी आशा आहे. कुस्ती संघटनेच्या अध्यक्षा महिला असल्यास महिला कुस्तीगीरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते चांगलेच होईल. देशाच्या बहिणी आणि मुलींसाठी ही लढत आहे.

पद्मश्री स्वीकारणार नाही- बजरंग

बजरंग पुनियाने नव्या कुस्ती महासंघाच्या निशेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला होता. देशातील कुस्तीपटूंना न्याय मिळाल्यानंतर पद्मश्री स्वीकारने, असे बजरंगने सांगितले आहे. 'आता मी पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. मी तो परत घेणार नाही. या पुरस्कारापेक्षा आपल्या बहिणी आणि मुलींचा सन्मान माझ्यासाठी मोठा आहे. जे घडत आहे ते सर्वांनी पाहिले आहे. न्याय मिळाल्यावरच हा पुरस्कार परत घेईन."

पुढील बातम्या