मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Bajrang Punia : मी ‘पद्मश्री’ पुरस्कार पंतप्रधानांना परत करतोय, बजरंग पुनियाची घोषणा

Bajrang Punia : मी ‘पद्मश्री’ पुरस्कार पंतप्रधानांना परत करतोय, बजरंग पुनियाची घोषणा

Dec 22, 2023, 05:46 PM IST

  • Bajrang Punia Returns Padma Shri Award : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्ती महासंघाचे नवे प्रमुख संजय सिंग यांच्या निषेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे.

Bajrang Punia Returns Padma Shri Award (PTI)

Bajrang Punia Returns Padma Shri Award : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्ती महासंघाचे नवे प्रमुख संजय सिंग यांच्या निषेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे.

  • Bajrang Punia Returns Padma Shri Award : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्ती महासंघाचे नवे प्रमुख संजय सिंग यांच्या निषेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे.

Bajrang Punia Returns Padma Shri Award : दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंग यांच्या निषेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. सोशल मीडियावर त्याने ही माहिती दिली. बजरंगला २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच बजरंग खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बजरंगने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्म पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे. या पत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना बजरंगने लिहिले की, "मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. हे माझे पत्र असून हेच माझे स्टेटमेंट आहे."

'कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांचा निषेध'

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग हे निवडून आले आहेत. याच्या निषेधार्थ बजरंग पुनियाने हा निर्णय घेतला आहे. काल गुरुवारी (२१ डिसेंबर) महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने याच कारणामुळे कुस्तीतून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती.

कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंग हे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या जवळचे आहेत. तर याच वर्षी भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात अनेकदा आंदोलने केली होती. त्यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत.

साक्षी मलिकसह बजरंग पुनिया आणि बबिता फोगट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांना विरोध केला होता. पण आता त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यानेच निवडणूक जिंकल्यानंतर साक्षी मलिकने गुरुवारी कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप

१८ जानेवारी रोजी भारतीय कुस्तीचे ३ मोठे कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि बबिता फोगट यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले. त्यांच्यासोबत इतर अनेक युवा पैलवान होते. कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब़ृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ आणि विनयभंगाचे आरोप केले. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी २१ जानेवारीला आंदोलन मागे घेतले.

एप्रिलमध्ये पुन्हा आंदोलन

ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने एप्रिलमध्ये आपला अहवाल सादर केला, पण तो सार्वजनिक करण्यात आला नाही. दरम्यान, अहवालात ब्रिजभूषण निर्दोष असल्याचे वृत्त समोर आले आहे. २३ एप्रिल रोजी कुस्तीपटू दुसऱ्यांदा संपावर बसले. पैलवानांनी जंतरमंतरवरच तळ ठोकला आणि रात्रंदिवस आंदोलन सुरू राहिले

 

पुढील बातम्या