मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mumbai Indians Jersey : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी बघितली का? फ्रँचायझीने फर्स्ट लुक केला शेअर

Mumbai Indians Jersey : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी बघितली का? फ्रँचायझीने फर्स्ट लुक केला शेअर

Feb 25, 2023, 03:02 PM IST

    • wpl 2023 mumbai indians jersey : मुंबई इंडियन्सने महिला IPL (WPL 2023) च्या पहिल्या सामन्यापूर्वी त्यांच्या जर्सीचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. फ्रँचायझीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करून जर्सीचे अनावरण केले.
wpl 2023 mumbai indians jersey

wpl 2023 mumbai indians jersey : मुंबई इंडियन्सने महिला IPL (WPL 2023) च्या पहिल्या सामन्यापूर्वी त्यांच्या जर्सीचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. फ्रँचायझीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करून जर्सीचे अनावरण केले.

    • wpl 2023 mumbai indians jersey : मुंबई इंडियन्सने महिला IPL (WPL 2023) च्या पहिल्या सामन्यापूर्वी त्यांच्या जर्सीचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. फ्रँचायझीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करून जर्सीचे अनावरण केले.

WPL 2023 Mumbai Indians Jersey : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) पहिल्या सीझनला आता एक आठवडा बाकी आहे. महिला आयपीएल ४ मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गुजरात जायंट्स (GG) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, मुंबई इंडियन्सने (WPL 2023) त्यांच्या जर्सीचा पहिला लूक शेअर केला आहे. फ्रँचायझीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करून जर्सीचे अनावरण केले. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians Jersey WPL) च्या जर्सीचा रंग हलका निळा आहे, ज्याच्या बाजूला गडद सोनेरी बॉर्डर आहे.

दरम्यान, बीसीसीआयने महिला आयपीएलच्या पहिल्या सीझनचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. पहिल्या सत्रात एकूण ५ संघ २२ सामने खेळतील. स्पर्धेतील सर्व सामने मुंबईतील डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या दोन स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स असे एकूण ५ संघ या स्पर्धेत उतरणार आहेत.

WPL 2023 साठी मुंबई इंडियन्सचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, नीलमणी कलिश, सोनम यादव .

पुढील बातम्या