मराठी बातम्या  /  क्रीडा  /  AUS W vs SA W Highlights : ऑस्ट्रेलियानं ६व्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला, आफ्रिकेचा थोडक्यात पराभव

AUS W vs SA W Highlights : ऑस्ट्रेलियानं ६व्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला, आफ्रिकेचा थोडक्यात पराभव

Feb 26, 2023, 05:24 PM IST

    • AUS W vs SA W Highlights : ऑस्ट्रेलियाने महिला T20 विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. फायनल सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला गेला.
AUS W vs SA W Highlights

AUS W vs SA W Highlights : ऑस्ट्रेलियाने महिला T20 विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. फायनल सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला गेला.

    • AUS W vs SA W Highlights : ऑस्ट्रेलियाने महिला T20 विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. फायनल सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला गेला.

SA W vs AUS W T20, Women's WC Final Highlights : ऑस्ट्रेलियाने महिला T20 विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. फायनल सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने ६व्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

Womens T20 World Cup Final Updates

ऑस्ट्रेलियाने महिला टी-20 विश्वचषक जिंकला

महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. या सोबतच ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघ सातव्यांदा टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत होता आणि त्यांनी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली.

केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ गडी गमावून १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत ६ गडी गमावून १३७ धावा करता आल्या. लॉरा वोल्वार्डने ४८ चेंडूत ६१ धावा केल्या. १७व्या षटकात ती बाद होताच दक्षिण आफ्रिकेच्या आशाही संपुष्टात आल्या.

ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी २०१०, २०१२, २०१४, २०१८ आणि २०२० मध्ये चॅम्पियन बनला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा महिला टी-20 विश्वचषकात विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे. यापूर्वी या संघाने २०१०, २०१२ आणि २०१४ मध्ये सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, आता २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये विजेतेपदं पटकावले आहेत. प्रथमच, एखाद्या संघाने पुरुष किंवा महिला क्रिकेटसह ICC स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे.

AUS W vs SA W T20 Live: The. आफ्रिकेला ८४ धावांची गरज 

१३ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेने तीन गडी गमावून ७३ धावा केल्या आहेत. सध्या आफ्रिकन संघाला ४२ चेंडूत ८४ धावांची गरज आहे. एल वोल्वार्ड ३८ चेंडूत ४१ धावा आणि क्लो ट्रायॉन नऊ चेंडूत पाच धावांवर खेळत आहे.

AUS-W vs SA-W, LIVE:  आफ्रिकेच्या ६ षटकात २२ धावा 

दक्षिण आफ्रिकेने संथ सुरुवात केली आहे. संघाने ६ षटकांत एक विकेट गमावून २२ धावा केल्या आहेत. मारिजन कॅप ४ आणि लॉरा ७ धावा करून खेळत आहे.

त्यापूर्वी, ताजमिन ब्रिट्स १७ चेंडूत १० धावा करून बाद झाली. तिला डार्सी ब्राउनने ताहिला मॅकग्रालाकरवी झेलबाद केले.

AUS W vs SA W T20 Live : आफ्रिकेला १५७ धावांचे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १५६ धावा केल्या. बेथ मुनीने तुफानी खेळी करताना ५३ चेंडूत नाबाद ७४ धावा केल्या. तिच्या खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

आता दक्षिण आफ्रिकेला इतिहास रचण्यासाठी १२० चेंडूत १५७ धावा करायच्या आहेत. आफ्रिकन संघाने हे करून दाखविल्यास, त्यांच्या पुरुष आणि महिला क्रिकेट इतिहासातील ही पहिली ICC ट्रॉफी असेल.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. एलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी पहिल्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. हीलीला २० चेंडूत १८ धावा करता आल्या. यामध्ये तीन चौकारांचा समावेश होता. यानंतर अॅशले गार्डनरने मुनीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. २१ चेंडूत २९ धावा करून गार्डनर क्लो ट्रायॉनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. गार्डनरने आपल्या खेळीत २ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर आलेल्या ग्रेस हॅरिसला काही खास करता आले नाही. ती ९ चेंडूत १० धावा करून बाद झाली. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगने ११ चेंडूत १० धावा केल्या. एलिस पेरी ५ चेंडूंत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. या दरम्यान, बेथ मुनीने शानदार अर्धशतक झळकावले. दोन विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतके झळकावणारी ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

beth mooney

अखेरच्या षटकात शबनीम इस्माईलने चौथ्या चेंडूवर एलिस पेरीला आणि पाचव्या चेंडूवर जॉर्जिया वेरेहमला बाद केले. तिला हॅट्ट्रिकची संधी होती, पण ताहिला मॅकग्राने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली. अशाप्रकारे शबनिमची हॅटट्रिक हुकली. बेथ मुनीने ५३ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७४ धावा केल्या.

तर दक्षिण आफ्रिकेकडून मारिजाने कॅप आणि शबनिम इस्माइलने प्रत्येकी २ गडी बाद केले. त्याचवेळी मलाबा आणि ट्रायॉन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

AUS W vs SA W T20 Live: मुनीने केला विक्रम

१८षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून १३४ धावा केल्या आहेत. सध्या बेथ मुनी ४६ चेंडूत ५६ धावा तर एलिस पॅरिस दोन चेंडूत पाच धावा खेळत आहे. कर्णधार मेग लॅनिंग ११ चेंडूत १० धावा करून बाद झाली. दोन T20 विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतके झळकावणारी बेथ मुनी जगातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

AUS W vs SA W T20 Live: ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

१५ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने तीन गडी गमावून ११० धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार मेग लॅनिंग चार चेंडूत सहा धावा आणि बेथ मुनीने ३७ चेंडूत ४२ धावांवर फलंदाजी करत आहे. मलाबाने १५ व्या षटकात ग्रेस हॅरिसला क्लीन बोल्ड केले. तिला ९ चेंडूत १० धावा करता आल्या.

त्यापूर्वी, ट्रायॉनने १२व्या षटकात ऍशले गार्डनरला सून लुसकरवी झेलबाद केले. २१ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९ धावा करून गार्डनर बाद झाली.

AUS W vs SA W T20 Live: गार्डनरची आक्रमक फलंदाजी

नऊ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून ६६ धावा केल्या आहेत. सध्या ऍशले गार्डनर १३ चेंडूत २६ धावा आणि बेथ मुनी २२ चेंडूत १९ धावा करुन फलंदाजी करत आहे. गार्डनरच्या आक्रमक फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या धावगतीने झेप घेतली आहे.

AUS W vs SA W T20 Live: ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅरिझान कॅपने अॅलिसा हिलीला नदिन डी क्लर्ककडे झेलबाद केले. हीलीला २० चेंडूत १८ धावा करता आल्या. तिने आपल्या खेळीत ३ चौकार मारले. पाच षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर ३६ अशी आहे. सध्या बेथ मुनी आणि ऍशले गार्डनर क्रीजवर आहेत.

AUS W vs SA W T20 Live : ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. तीन षटकांत संघाने एकही विकेट न गमावता १८ धावा केल्या आहेत. सध्या बेथ मुनी सहा चेंडूत पाच धावा आणि अ‍ॅलिसा हिली १२ चेंडूत ११ धावांवर खेळत आहे.

AUS W vs SA W T20 Live : दोन्ही संघ

ऑस्ट्रेलिया: अॅलिसा हिली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहिला मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शुट, डी'आर्सी ब्राउन.

दक्षिण आफ्रिका: एल वोल्वार्ड, ताजमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, सुने लुस (कर्णधार), क्लो ट्रायनॉन, अनेके बॉश, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.

AUS W vs SA W T20 Live: ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी

ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार सुने लुसनेही प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

यजमान दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा ६ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच वर्ल्डकप फायनल गाठली आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा ५ धावांनी पराभव केला होता. ऑस

ऑस्ट्रेलियाच्या संघाने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ साखळी टप्प्यातील दोन सामने गमावून फायनलपर्यंत पोहोचला आहे.

दोन्ही संघ

दक्षिण आफ्रिका:

सुने लुउस (कर्णधार), अॅनेरी डर्कसेन, मारिजन कॅप, लारा गुडॉल, अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, शबनीम इस्माईल, तझमिन ब्रिट्स, मसाबता क्लास, लॉरा वोल्वार्ड, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, डेल्मी बोस्च, अॅनी. टकर.

ऑस्ट्रेलिया:

मेग लॅनिंग (कर्णधार), अॅलिसा हिली, डी'आर्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.

पुढील बातम्या