मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Wimbledon : जोकोविचने २१ वे ग्रँडस्लॅम जिंकले, सातव्यांदा विम्बल्डन चॅम्पिययन

Wimbledon : जोकोविचने २१ वे ग्रँडस्लॅम जिंकले, सातव्यांदा विम्बल्डन चॅम्पिययन

Jul 10, 2022, 10:19 PM IST

    • सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा विम्बल्डन ओपन जिंकले आहे.
Novak Djokovic

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा विम्बल्डन ओपन जिंकले आहे.

    • सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा विम्बल्डन ओपन जिंकले आहे.

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा विम्बल्डन ओपन जिंकले आहे. त्याने रविवारी (१० जुलै) पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा चार सेटमध्ये पराभव केला. जोकोविचने हा सामना ४-६, ६-३, ६-४, ७-६ (७-३) असा जिंकला. त्याने आपल्या कारकिर्दीतील २१ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत जोकोविच आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सर्वाधिक विम्बल्डन जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जोकोविच आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर त्याच्या पुढे स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आहे. फेडररने ८ विम्बल्डन जिंकले आहेत. २०१७ मध्ये त्याने अखेरचे विजेतेपद पटकावले होते. सातव्यांदा चॅम्पियन बनून जोकोविचने अमेरिकेच्या पीट सॅम्प्रासची बरोबरी केली आहे.

दरम्यान, विम्बल्डनच्या अंतिम फेरीत जोकोविच आणि किर्गिओस प्रथमच आमने सामने आले होते. जोकोविचने आता विम्बल्डनमध्ये ९६ पैकी ८६ सामने जिंकले आहेत.

तसेच, जोकोविचने विम्बल्डनमध्ये आतापर्यंत सलग २८ सामने जिंकले आहेत.  जोकोविचचे हे ३२ वे ग्रँडस्लॅम फायनल होते. त्याने सर्वाधिक ग्रँडस्लॅम फायनल खेळण्याच्या बाबतीत रॉजर फेडररला मागे टाकेल आहे. फेडररने ३१ फायनल खेळले आहेत.

यासोबतच जोकोविचने २१ वे ग्रँडस्लॅम पटकावले आहे. याबाबतीत  तो आता फक्त राफेल नदालच्या मागे आहे. राफेल नदालच्या नावार २२ ग्रँडस्लॅम आहेत.

पुढील बातम्या