मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant Wicketkeeping : ऋषभ पंत भविष्यात विकेटकीपिंग करू शकणार का? समोर आली धक्कादायक माहिती, पाहा

Rishabh Pant Wicketkeeping : ऋषभ पंत भविष्यात विकेटकीपिंग करू शकणार का? समोर आली धक्कादायक माहिती, पाहा

Jul 02, 2023, 11:38 AM IST

    • Rishabh Pant health update : ऋषभ पंत २०२४ मध्ये मैदानात पुनरागमन करू शकतो. मात्र, पुनरागमन केल्यानंतरही पंत काही काळ विकेटकीपिंग करू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
Rishabh Pant Wicketkeeping

Rishabh Pant health update : ऋषभ पंत २०२४ मध्ये मैदानात पुनरागमन करू शकतो. मात्र, पुनरागमन केल्यानंतरही पंत काही काळ विकेटकीपिंग करू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.

    • Rishabh Pant health update : ऋषभ पंत २०२४ मध्ये मैदानात पुनरागमन करू शकतो. मात्र, पुनरागमन केल्यानंतरही पंत काही काळ विकेटकीपिंग करू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.

Rishabh Pant Wicketkeeping : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. पंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) फिटनेसवर मेहनत घेत आहे. पंतच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. मात्र, यानंतरही पंत फिट झाल्यानंतर यष्टिरक्षण करू शकणार का, हा प्रश्न कायम आहे. कारण कार अपघातानंतर ऋषभ पंतवर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यानंतर आता पंत विकेटकीपिंगचा भार पेलणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

'इनसाइडस्पोर्ट'शी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ऋषभ पंतबद्दल एक खुलासा केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, ऋषभ पंत थेट विकेटकीपिंग करेल हे सांगणे फार कठीण आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “ऋषभची फिटनेसची प्रगती उत्कृष्ट आहे. पण या टप्प्यावर, तो लगेच विकेटकीपिंग सुरू करेल की नाही हे सांगणे फार कठीण आहे.

सरावाला परतल्यानंतर ऋषभ पंतला विकेटकीपिंग सुरू करण्यासाठी ३ ते ६ महिने लागू शकतात, असेही सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “सरावात परतल्यानंतर पंतला विकेटकीपिंग करण्यास ३ महिने लागू शकतात किंवा ६ महिन्यांपेक्षाही जास्त वेळ लागू शकतो. आता काही सांगता येणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी ते संयमाने घ्यावे. ऋषभ अजूनही तरुण आहे आणि त्याच्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर वेळ आहे. पण त्याला ज्या प्रकारची दुखापत झाली आहे, त्यामुळे तो घाई करू शकत नाही.

ऋषभ मैदानावर कधी परतेल, अद्याप स्पष्ट नाही

विशेष म्हणजे पंतच्या पुनरागमनाबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट झालेले नाही. पण २०२४ पर्यंत तो पुनरागमन करू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. अशा स्थितीत पुढील म्हणजेच आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला पंतच्या विकेटकीपिंगची उणीव भासू शकते. आयपीएल २०२३ मध्ये पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरने दिल्लीची कमान सांभाळली होती, पण पंतसारखा तगडा यष्टिरक्षक संघाला मिळू शकला नाही.

पुढील बातम्या