मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Who Is Sikandar Shaikh: कोण आहे सिकंदर शेख? हरल्यानंतरही ठरलाय सोशल मीडियाचा हिरो

Who Is Sikandar Shaikh: कोण आहे सिकंदर शेख? हरल्यानंतरही ठरलाय सोशल मीडियाचा हिरो

Jan 15, 2023, 12:52 PMIST

sikandar shaikh maharshtra kesari: शिवराज राक्षेने यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी २०२३ साठी अंतिम फेरीची लढत महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात रंगली. यात राक्षेने गायकवाडला चितपट करत पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले. शिवराज राक्षे ५५ वा महाराष्ट्र केसरी पैलवान ठरला आहे. दरम्यान, या स्पर्धेनंतर सिकंदर शेखची प्रचंड चर्चा सुरू आहे. सिकंदर सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाडकडून पराभूत झाला होता.

  • sikandar shaikh maharshtra kesari: शिवराज राक्षेने यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी २०२३ साठी अंतिम फेरीची लढत महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात रंगली. यात राक्षेने गायकवाडला चितपट करत पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले. शिवराज राक्षे ५५ वा महाराष्ट्र केसरी पैलवान ठरला आहे. दरम्यान, या स्पर्धेनंतर सिकंदर शेखची प्रचंड चर्चा सुरू आहे. सिकंदर सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाडकडून पराभूत झाला होता.
शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे, त्याचे कौतुक होतच आहे. पण सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाडकडून पराभूत झालेल्या सिकंदर शेख हा सोशल मीडियावर हिरो ठरला आहे.
(1 / 10)

सिकंदर शेखने माती विभागात माजी महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखला धुळ चारत सेमी फायनल गाठली होती. 
(2 / 10)

मातीवरची फायनल आणि महाराष्ट्र केसरीची सेमी फायनल कुस्ती महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखमध्ये झाली. यात महेंद्रने बाजी मारली. महेंद्रने बाहेरची टांग डाव टाकत सिकंदरचा पराभव केला. या डावाचीदेखील प्रचंड चर्चा सुरु आहे.
(3 / 10)

महेंद्र गायकवाडने टाकलेला बाहेरील टांग हा डाव नियमानुसार नव्हता सिकंदर शेख डेन्जर पोझिशनला नव्हता मग त्याला ४ गुण का देण्यात आले? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.
(4 / 10)

सिकंदरवर खरंच अन्याय झाला का? याचे उत्तर कुस्तीमधील तज्ज्ञ देतील. पण सिकंदरचा खडतर प्रवास हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंतचा सिकंदरचा प्रवास हा अतिशय खडतर राहिला आहे.
(5 / 10)

सिकंदरच्या घरात प्रचंड गरिबी होती. हमालाचा पोरगा ते कुस्तीपटू असा सिकंदरचा प्रवास आहे.
(6 / 10)

सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला असून त्याच्या घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा आहे. त्याचे वडीलही कुस्ती खेळायचे. पण गरिबीमुळे त्यांना हमालीचे काम करावे लागत होते.
(7 / 10)

सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. तो सैन्यदलाकडूनही खेळतो. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडीलांची इच्छा त्याने पुर्ण केली आहे.
(8 / 10)

सिंकदरने आतापर्यंत देशभरात अनेक कुस्त्या लढून बक्षिसे जिंकली आहेत. यामध्ये सिकंदरने एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रॅक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीएस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदीच्या गदा जिंकल्या आहेत.
(9 / 10)

 Sikander Shaikh
(10 / 10)
 Sikander Shaikh

    शेअर करा