मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Prithvi Shaw: यह दुःख काहे खत्म नहीं होता बे… चांगली कामगिरी करूनही पृथ्वी शॉवर अन्याय?

Prithvi Shaw: यह दुःख काहे खत्म नहीं होता बे… चांगली कामगिरी करूनही पृथ्वी शॉवर अन्याय?

Oct 03, 2022, 05:36 PM IST

    • Prithvi Shaw instagram post: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी पृथ्वी शॉची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे तो नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. युवा पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, सध्या तो चांगल्या फॉर्मात असून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
Prithvi Shaw

Prithvi Shaw instagram post: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी पृथ्वी शॉची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे तो नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. युवा पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, सध्या तो चांगल्या फॉर्मात असून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.

    • Prithvi Shaw instagram post: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी पृथ्वी शॉची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे तो नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. युवा पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, सध्या तो चांगल्या फॉर्मात असून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळल्यानंतर टीम इंडिया तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचा कर्णधार शिखर धवन, तर उपकर्णधार श्रेयस अय्यरला करण्यात आले. वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये अनेक नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

मात्र, या वनडे मालिकेसाठी पृ्थ्वी शॉची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे क्रिकेट विश्वात चर्चेला उधाण आले आहे. युवा पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, सध्या तो चांगल्या फॉर्मात असून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध त्याची संघात निवड होईल,अशी त्याला आशा होती. पण तसे झाले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत निवड न होणे हा त्याच्यासाठी देखील एक मोठा धक्का आहे.

पृथ्वी शॉ कुठे आहे?

२२ वर्षीय पृथ्वी शॉने २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तर २०२१ मध्ये त्याने त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून, पृथ्वी शॉ टीम इंडियाच्या संघातून गायब आहे आणि तो फक्त देशांतर्गत क्रिकेट किंवा आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे.

सातत्याने धावा करुनही दुर्लक्ष

अलीकडेच पृथ्वी शॉ न्यूझीलंड-अ विरुद्ध इंडिया-अ संघाकडून खेळत होता. या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली. पृथ्वी शॉने येथे ७७ धावांची शानदार खेळी खेळली. यापूर्वी दुलीप ट्रॉफीमध्येही पृथ्वी शॉने मध्य विभागाविरुद्ध ६० आणि १४२ धावा केल्या होत्या. तर उत्तर विभागाविरुद्ध ११३ धावा केल्या होत्या. मात्र, असे असूनही तो दुलर्क्षित राहिला आहे.

पृथ्वीच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काय आहे

दरम्यान, रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच पृथ्वी शॉने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. यामध्ये त्याने लिहिले आहे की, शब्दांवर विश्वास ठेवू नका, त्याच्या कामावर विश्वास ठेवू नका, कृती हे सिद्ध करत आहे की शब्द निरर्थक का आहेत. पृथ्वी शॉने येथे कोणाचेही नाव घेतले नसले तरी तो निराश झाल्याचे मानले जात आहे.

 

पुढील बातम्या