मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mirabai Chanu: मनगटाला दुखापत तरी उचललं २०० किलो वजन, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाईनं रचला इतिहास

Mirabai Chanu: मनगटाला दुखापत तरी उचललं २०० किलो वजन, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाईनं रचला इतिहास

Dec 07, 2022, 11:00 AM IST

    • Mirabai Chanu wins silver medal, world championships 2022: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो गटात २०० किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे.
Mirabai Chanu wins silver medal

Mirabai Chanu wins silver medal, world championships 2022: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो गटात २०० किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे.

    • Mirabai Chanu wins silver medal, world championships 2022: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो गटात २०० किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण २०० किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

तर चीनची वेटलिफ्टर जियांग हुइहुआने २०६ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. सोबतच आणखी एक चिनी वेटलिफ्टर हौ झिहुईने १९८ किलो वजन उचलून कांस्यपदाची कमाई केली. कोलंबियातील बोगोटा येथे ही स्पर्धा पार पडली.

विशेष म्हणजे, झिहुई ही ४९ किलो वजनी गटातील ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. मीराबाईने या स्पर्धेत झिहूईचा पराभव केला आणि रौप्य पदक पटकावले. झिहुईला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील मीराबाईचा प्रवास सोपा नव्हता. स्पर्धेदरम्यान ती दुखापतीशी झुंजत होती. तिने क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलले. मात्र, स्नॅच प्रकारात वजन उचलत असताना तिचा तोल गेला पण अशा परिस्थितीतही तिने स्वता:चा शानदार बचाव केला. मीराबाईने स्नॅचमध्ये ८७ किलो वजन उचलले. अशा प्रकारे तिने एकूण २०० किलो वजन उचलून इतिहास रचला.

विशेष म्हणजे, मीराबाई चानूला या वर्षी सप्टेंबरमध्ये ट्रेनिंदरम्यान दुखापत झाली होती. ती मनगटाच्या दुखापतीशी झुंज देत आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या नॅशनल गेम्समध्येही ती दुखापतीसह सहभागी झाली होती. मीराबाईचे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दुसरे पदक आहे. यापूर्वी मीराबाई चानू २०१७ मध्ये १९४ किलो (८५ आणि १०९ किलो) वजन उचलून सुवर्ण जिंकले होते.

पुढील बातम्या