मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Wrestler Protest : सचिन-नीरज चोप्रा तुमचा निर्णय सांगा, ३ सुवर्ण जिंकणारा विरेंद्र सिंग 'पद्मश्री' परत करणार

Wrestler Protest : सचिन-नीरज चोप्रा तुमचा निर्णय सांगा, ३ सुवर्ण जिंकणारा विरेंद्र सिंग 'पद्मश्री' परत करणार

Dec 23, 2023, 06:48 PM IST

    • Wrestler Protest : आता तीन सुवर्णपदक जिंकणारा कुस्तीपटू वीरेंद्र सिंग यानेही साक्षी मलिकच्या समर्थनार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Wrestler Protest

Wrestler Protest : आता तीन सुवर्णपदक जिंकणारा कुस्तीपटू वीरेंद्र सिंग यानेही साक्षी मलिकच्या समर्थनार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

    • Wrestler Protest : आता तीन सुवर्णपदक जिंकणारा कुस्तीपटू वीरेंद्र सिंग यानेही साक्षी मलिकच्या समर्थनार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Virender Singh Support Sakshi Malik : देशातील कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघ यांच्या वाद पुन्हा चिघळला आहे. दोन दिवसांआधी कुस्ती संघाची निवडणूक झाली या निवडणूकीत संजय सिंह हे निवडून आले आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनले, संजय सिंग हे ब्रिजभूषण सिंह यांचे विश्वासू आणि व्यावसायिक भागिदार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

याचा निषेध म्हणून साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तर काल शुक्रवारी (२२ डिसेंबर) बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत केला.

आता तीन सुवर्णपदक जिंकणारा कुस्तीपटू वीरेंद्र सिंग यानेही साक्षी मलिकच्या समर्थनार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सचिन-नीरज चोप्राला ट्वीट टॅग

भारतीय वीरेंद्र सिंह याने त्यांच्या एक्स हँडलवर याची घोषणा केली. आपल्या बहिणीचा आणि देशाच्या कन्येचा सन्मान मिळवून देण्यासाठी पद्मश्री परत करणार असल्याचे विरेंद्रने म्हटले आहे. तसेच अव्वल खेळाडूंनाही त्यांचा निर्णय घेण्याचे आवाहन केले.

इतकंच नाही तर वीरेंद्र सिंहने आपल्या पोस्टमध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनाही टॅग केले आहे. देशातील अव्वल खेळाडूंनी यावर आपला निर्णय घ्यावा, असे आवाहन विरेंद्र सिंगने केले आहे.

वीरेंद्र सिंगने डेफलिम्पिकमध्ये ३ सुवर्ण पदकं जिंकली

वीरेंद्र सिंगने वीरेंद्र सिंग हे कर्णबधिर ऑलिम्पिकमधील (डेफलिम्पिक) भारताचे प्रसिद्ध नाव आहे. त्याने देशासाठी ३ सुवर्ण आणि २ कांस्यपदके जिंकली आहेत. २०२१ मध्ये त्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीमुळे कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या जागी संजय सिंह यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर साक्षीने मीडियासमोर पत्रकार परिषद घेऊन रडत रडत कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. याशिवाय बजरंग पुनिया याने त्याचा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

भारतीय कुस्ती संघटना आणि कुस्तीपटू यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी आंदोलने केली होती. यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे शोषण केल्याचा आरोप होता आणि जवळपास ४० दिवस त्यांच्याविरोधात निदर्शने झाली.

नवीन अध्यक्ष संजय सिंग हे ब्रिजभूषण शरणसिंग यांच्याच गटातील असल्याचे सांगत कुस्तीपटूंनी त्यांनाही विरोध केला आहे.

पुढील बातम्या