मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kohli vs Naveen Ul Haq : नवीन उल हकच्या इन्स्टा स्टोरीला कोहलीचं उत्तर, म्हणाला, तुमची लढाई…

Kohli vs Naveen Ul Haq : नवीन उल हकच्या इन्स्टा स्टोरीला कोहलीचं उत्तर, म्हणाला, तुमची लढाई…

May 10, 2023, 06:16 PM IST

    • Naveen Ul Haq instagram story : विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने 'तुमची लढाई तुमच्या मनाशी आहे' असं लिहिलं आहे. चाहते ही पोस्ट नवीन उल हक याच्याशी जोडत आहेत.
virat kohli vs naveen ul haq

Naveen Ul Haq instagram story : विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने 'तुमची लढाई तुमच्या मनाशी आहे' असं लिहिलं आहे. चाहते ही पोस्ट नवीन उल हक याच्याशी जोडत आहेत.

    • Naveen Ul Haq instagram story : विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने 'तुमची लढाई तुमच्या मनाशी आहे' असं लिहिलं आहे. चाहते ही पोस्ट नवीन उल हक याच्याशी जोडत आहेत.

virat kohli reply to Naveen Ul Haq : IPL 2023 चा ५४वा सामना मंगळवारी (९ एप्रिल) मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेट्सनी पराभव करत सहाव्या विजयाची नोंद केली. या विजयासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. त्याचवेळी आरसीबीसाठी प्लेऑफचा रस्ता कठीण झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वानखेडेवर झालेल्या या सामन्यात आरसीबीचा विराट कोहली विशेष काही करू शकला नाही आणि अवघी एक धाव काढून तंबूत परतला. कोहली बाद होताच लखनौ सुपर जायंट्सच्या नवीन-उल-हकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला. नवीनची ही इन्स्टाग्राम स्टोरी चाहते कोहलीशी जोडत आहेत.

नवीनच्या दोन इन्स्टा स्टोरी चर्चेत

नवीनच्या इन्स्टा स्टोरीमध्ये आरसीबी आणि मुंबई यांच्यातील सामना टीव्हीवर दिसत होता. तर कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, "आंबे खूप गोड आहेत." नवीनच्या या स्टोरीचा संबंध कोहलीशी जोडला जात असून यावरून सोशल मीडियावर मीम्स आणि प्रतिक्रियांचा महापूर आला आहे.

तसेच, नवीन एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सामना संपल्यानंतर आणखी एक स्टोरी पोस्ट केली. त्यामध्ये पुन्हा काही आंब्याचे फोटो आणि टेलिव्हिजन स्क्रीनवर मुंबई इंडियन्सचे फलंदाज सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा दिसत होते. सुर्या आणि वढेराने मुंबईच्या विजयाचे हिरो होते.

Naveen Ul Haq Instagram Story

'तुमची लढाई तुमच्या मनाशी आहे, -विराट

यानंतर आता विराट कोहलीने नवीन-उल-हकवर जोरदार प्रहार केला आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये विराट कोहली खुर्चीवर बसलेला दिसत आहे. यासोबतच 'तुमची लढाई तुमच्या मनाशी आहे' असंही त्याने लिहिलं आहे. यानंतर सोशल मीडिया युजर्सना वाटत आहे की, विराट कोहलीची ही पोस्ट नवीन-उल-हकला प्रत्युत्तर आहे.

नवीन आणि कोहली यांच्यात वाद झाला होता

लखनौ आणि आरसीबी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात जोरदार भांडण झाले होते. सामन्यादरम्यान कोहली नवीनला काहीतरी बोलताना दिसला, त्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजानेही कोहलीला उत्तर दिले आणि दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सामना संपल्यानंतरही हस्तांदोलन करताना विराट आणि नवीन एकमेकांना भिडले होते. यादरम्यान मॅक्सवेलने हस्तक्षेप करुन दोघांना वेगळे केले होते.

या वादानंतर दोन्ही खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत एकमेकांना थेट किंवा अप्रत्यक्षपणे टार्गेट करत आहेत. मंगळवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाल्यानंतर नवीन-उल-हकने विराट कोहली आणि आरसीबीची खिल्ली उडवली. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकची इंस्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुढील बातम्या