मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ben Stokes : स्टोक्सच्या इनिंगवर कोहलीची प्रतिक्रिया, सामना गमावला पण इंग्लंडच्या कॅप्टननं चाहत्यांची मनं जिंकली

Ben Stokes : स्टोक्सच्या इनिंगवर कोहलीची प्रतिक्रिया, सामना गमावला पण इंग्लंडच्या कॅप्टननं चाहत्यांची मनं जिंकली

Jul 02, 2023, 10:10 PM IST

    • Ben Stokes England vs Australia 2nd Test : ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने १५५ धावांची शानदार खेळी केली. स्टोक्सची खेळी आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयावर कोहलीची प्रतिक्रिया आली आहे.
ben stokes and virat kohli

Ben Stokes England vs Australia 2nd Test : ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने १५५ धावांची शानदार खेळी केली. स्टोक्सची खेळी आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयावर कोहलीची प्रतिक्रिया आली आहे.

    • Ben Stokes England vs Australia 2nd Test : ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने १५५ धावांची शानदार खेळी केली. स्टोक्सची खेळी आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयावर कोहलीची प्रतिक्रिया आली आहे.

Virat Kohli reaction on Ben Stokes : लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४३ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अॅशेस २०२३ मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला असला तरी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने १५५ धावांच्या खेळीने चाहत्यांची तसेच अनेक दिग्गजांची मने जिंकली आहेत. स्टोक्सच्या या धाडसी खेळीवर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचीही प्रतिक्रिया आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

लॉर्ड्स कसोटीत ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने १५५ धावांची ऐतिहासिक खेळी केली. स्टोक्सने २१४ चेंडूंच्या खेळीत ९ चौकार आणि ९ षटकार मारले. इंग्लंडचे ६ विकेट पडल्यानंतर स्टोक्सने आक्रमक पवित्रा घेत स्टुअर्ट ब्रॉडसोबत १०९ धावांची भागीदारी केली. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

बेन स्टोक्स सर्वात तगडा प्रतिस्पर्धी

इंग्लंडच्या पराभवानंतर विराट कोहलीने ट्विट केले की, "मी ज्या खेळाडूंसोबत खेळलो आहे. त्या खेळाडूंमध्ये बेन स्टोक्स हा सर्वात तगडा प्रतिस्पर्धी खेळाडू आहे. सर्वोच्च दर्जाची खेळी. पण सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या खूप मजबूत आहे."

लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४१६ धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या ३२५ धावांवर गारद झाला. मात्र, यजमानांनी दुसऱ्या डावात पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला २७९ धावांवर रोखले. अशाप्रकारे इंग्लंडला दुसऱ्या डावात ३७१ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, प्रत्युत्तरात इंग्लंडला ३२७ धावाच करता आल्या. 

अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी ४३ धावांनी जिंकली. यासह कांगारू संघाने 2023 च्या ऍशेस मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने ११०, ट्रॅव्हिस हेडने ७७ आणि डेव्हिड वॉर्नरने ६६ धावा केल्या. त्याचवेळी, इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन डकेटने ९८ आणि हॅरी ब्रूकने ५० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ७७ धावा केल्या.

पुढील बातम्या