मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Century Celebration : शतकानंतर विराटचं सेलिब्रेशन बघितलं का? अनुष्काला दिलं श्रेय

Virat Kohli Century Celebration : शतकानंतर विराटचं सेलिब्रेशन बघितलं का? अनुष्काला दिलं श्रेय

Mar 12, 2023, 03:12 PM IST

    • Virat Kohli Century Celebration : विराट कोहलीचे हे २८वे कसोटी शतक आहे. तब्बल ३ वर्षे ३ महिन्यांनंतर त्याच्या बॅटमधून कसोटी शतक झळकले आहे. विराट कोहलीने टी-२०, वनडेनंतर कसोटीतही शतकांचा दुष्काळ संपवला आहे.
Virat Kohli Century Celebration

Virat Kohli Century Celebration : विराट कोहलीचे हे २८वे कसोटी शतक आहे. तब्बल ३ वर्षे ३ महिन्यांनंतर त्याच्या बॅटमधून कसोटी शतक झळकले आहे. विराट कोहलीने टी-२०, वनडेनंतर कसोटीतही शतकांचा दुष्काळ संपवला आहे.

    • Virat Kohli Century Celebration : विराट कोहलीचे हे २८वे कसोटी शतक आहे. तब्बल ३ वर्षे ३ महिन्यांनंतर त्याच्या बॅटमधून कसोटी शतक झळकले आहे. विराट कोहलीने टी-२०, वनडेनंतर कसोटीतही शतकांचा दुष्काळ संपवला आहे.

ind vs aus 4th test Virat Kohli Century Celebration : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आहे. त्याने २४१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

विराट कोहलीचे हे २८वे कसोटी शतक आहे. तब्बल ३ वर्षे ३ महिन्यांनंतर त्याच्या बॅटमधून कसोटी शतक झळकले आहे. विराट कोहलीने टी-२०, वनडेनंतर कसोटीतही शतकांचा दुष्काळ संपवला आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून शेवटचे कसोटी शतक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी झळकले होते. विराट कोहलीने ४१ डावांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४८० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव सुरू असून सामन्याचा आज (१२ मार्च) चौथा दिवस आहे. हे वृत्त लिहिपर्यंत भारताच्या ५ बाद ५०२ धावा झाल्या आहेत. विराट कोहली १५५ तर अक्षर पटेल ४८ धावांवर खेळत आहेत.

शतकानंतर अंगठीचे चुंबन घेतले

विराट कोहलीने नॅथन लायनच्या चेंडूवर फ्लिक करुन सिंगल घेत आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यानंतर विराटचा आनंद पाहण्यासारखा होता. या सामन्यापूर्वी त्याला १५ डावात अर्धशतकही करता आले नव्हते. शतक पूर्ण केल्यानंतर त्याने रिंगला किस करून सेलिब्रेशन केले. दरम्यान, अंगठी बोटात घातली जाते, पण क्रिकेट खेळताना विराट ती चेनच्या साह्याने गळ्यात घालतो. आशिया चषकातही शतक झळकावल्यानंतर विराटने लॉकेटसोबतच्या अंगठीचे चुंबन घेतले होते.

पत्नी अनुष्काला श्रेय देतो

विराट कोहली आपल्या कामगिरीचे बरेच श्रेय पत्नी अनुष्का शर्माला देतो. २०१७च्या डिसेंबरमध्ये विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले होते. अनेक मुलाखतींमध्ये तो त्याच्यातील बदलाचे श्रेय अनुष्काला देतो. आशिया चषक स्पर्धेत जवळपास ३४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते, तेव्हादेखील त्याचे श्रेय त्याने पत्नी आणि मुलीला दिले होते.

दुसरे संथ शतक

विराट कोहलीचे हे कसोटीतील दुसरे संथ शतक आहे. याआधी नागपूर २०१२ मध्ये विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध २८९ चेंडूत सर्वात संथ कसोटी शतक झळकावले होते. या सामन्यात २४१ चेंडूत शतक ठोकले. याशिवाय, २०१८ च्या पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच शतक झळकावण्यासाठी त्याने २००+ चेंडूंचा सामना केला.

पुढील बातम्या