मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kohli-Ganguly : कोहली आणि गांगुली यांच्यात सर्व काही ठीक? हा व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा

Kohli-Ganguly : कोहली आणि गांगुली यांच्यात सर्व काही ठीक? हा व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा

May 07, 2023, 06:02 PM IST

    • DC vs RCB ipl 2023 Virat Kohli Sourav Ganguly : दिल्ली-आरसीबी सामन्यानंतर मैदानावर एक सुखद घटना घडली. ज्याची अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी केली नसेल. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
virat kohli and sourav ganguly

DC vs RCB ipl 2023 Virat Kohli Sourav Ganguly : दिल्ली-आरसीबी सामन्यानंतर मैदानावर एक सुखद घटना घडली. ज्याची अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी केली नसेल. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

    • DC vs RCB ipl 2023 Virat Kohli Sourav Ganguly : दिल्ली-आरसीबी सामन्यानंतर मैदानावर एक सुखद घटना घडली. ज्याची अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी केली नसेल. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

DC vs RCB, Virat Kohli, Sourav Ganguly : आयपीएल 2023 चा ५० वा सामना शनिवारी (६ एप्रिल) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या या सामन्यात फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ४ गडी गमावून १८१ धावा केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने ३ गडी गमावून १८७ धावा केल्या आणि सामना ७ गडी राखून जिंकला. सामन्यानंतर मैदानावर एक सुखद घटना घडली. ज्याची अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी केली नसेल. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

गांगुली कोहलीमध्ये सर्वकाही ठीक

खरं तर, सामन्यानंतर, जेव्हा दोन्ही संघ आणि (virat kohli and sourav ganguly shake hands) सपोर्ट स्टाफ एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीशी हस्तांदोलन केले. या हंगामाच्या सुरुवातीला जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडले तेव्हा आरसीबीने दिल्लीचा २३ धावांनी पराभव केला होता आणि सामना संपल्यानंतर दादा आणि कोहली यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नव्हते. या घटनेची प्रचंड चर्चा झाली होती. या प्रसंगाचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला जात होता. गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना विराट आणि त्याच्यातील मतभेदाच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या.

गांगुली BCCI अध्यक्ष असताना दोघांमध्ये मतभेद

२०२१-२२ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने अप्रत्यक्षपणे गांगुलीला खोटारडे म्हटले होते आणि त्याला कॅप्टनसीबाबत कोणताही फोन आला नसल्याचे सांगितले होते. यानंतर निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी ही अहंकाराची लढाई असल्याचे म्हटले होते. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा म्हणाले होते की, “जेव्हा एखादा खेळाडू लोकप्रिय होतो तेव्हा तो स्वत:ला बोर्डापेक्षा मोठा समजतो आणि त्याला कोणी हात लावू शकत नाही, असा त्याचा समज होतो'.

मात्र, आता कालचा (७ एप्रिल) दोघांचा हस्तांदोलनाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गांगुली आणि कोहली यांच्यात सर्वकाही ठीक असल्याचे बोलले जात आहे.

पुढील बातम्या