मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat - Anushka : पॅरिसनंतर विराट आता लंडनमध्ये, अनुष्कासोबत लंच डेट

Virat - Anushka : पॅरिसनंतर विराट आता लंडनमध्ये, अनुष्कासोबत लंच डेट

Jul 27, 2022, 11:17 AM IST

    • कोहली आणि अनुष्काचे लंडनमध्ये फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच हे जोडपे शहरातील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. 
virat-anushka

कोहली आणि अनुष्काचे लंडनमध्ये फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच हे जोडपे शहरातील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते.

    • कोहली आणि अनुष्काचे लंडनमध्ये फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच हे जोडपे शहरातील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. 

इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. खराब फॉर्ममध्ये असलेला कोहली जगातील विविध शहरांमध्ये फिरत आहे. इंग्लंडहून तो आपल्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत फ्रान्सची राजधानी पॅरिसला गेला होता. त्यानंतर आता विराट आणि अनुष्का पॅरिसहून लंडनला पोहोचले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दोघांचे लंडनमध्ये फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच हे जोडपे शहरातील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. त्यानंतर दोघांचा शेफसोबतचा पोज देतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. रेस्टॉरंटचे शेफ सुरेंद्र मोहनने ट्विटरवर बॉम्बे बस्टल रेस्टॉरंटच्या बाहेर विराट आणि अनुष्कासोबतचे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘भारताची शान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आमच्या येथे जेवणाचा आस्वाद घेतला. हा आमचा सन्मान आहे’.

कोहलीसाठी करिअरचा वाईट काळ-

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. धावा काढण्यासाठी धडपडणाऱ्या विराटला टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघातून काढून टाकण्याची मागणी होत आहे. तीन वर्षांपूर्वीपर्यंत विराट कोहलीला जगभरात रन मशीन म्हटले जात होते, पण आता परिस्थिती अशी झाली आहे की, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातून त्याला वगळण्यासाठी माजी खेळाडू आवाज उठवू लागले आहेत .

मात्र, कर्णधार रोहित शर्मा आपला सहकारी विराटचा बचाव करताना दिसत आहे, परंतु दिग्गज कपिल देव, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे बीसीसीआय आणि निवडकर्त्यांसाठी कठीण होणार आहे.

पुढील बातम्या