मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Wrestling Championship : विनेश फोगटचं कुस्तीच्या मॅटवर दणक्यात पुनरागमन, साक्षी मलिकच्या हातून मिळालं सुवर्ण पदक

Wrestling Championship : विनेश फोगटचं कुस्तीच्या मॅटवर दणक्यात पुनरागमन, साक्षी मलिकच्या हातून मिळालं सुवर्ण पदक

Feb 04, 2024, 09:41 PM IST

  • National Wrestling Championship : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या विनेशने या लढतीत मध्य प्रदेशच्या ज्योतीवर ४-० असा विजय मिळवला. विनेशने या स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचे प्रतिनिधित्व केले.

Vinesh Phogat Wins Gold At Senior National Wrestling Championship

National Wrestling Championship : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या विनेशने या लढतीत मध्य प्रदेशच्या ज्योतीवर ४-० असा विजय मिळवला. विनेशने या स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचे प्रतिनिधित्व केले.

  • National Wrestling Championship : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या विनेशने या लढतीत मध्य प्रदेशच्या ज्योतीवर ४-० असा विजय मिळवला. विनेशने या स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचे प्रतिनिधित्व केले.

Vinesh Phogat Wins Gold At Wrestling Championship : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या मैदानात दमदार पुनरागमन केले आहे. विनेशने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अ‍ॅडहॉक समितीने आयोजित केलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. ही स्पर्धा जयपूर येथे खेळली गेली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या विनेशने या लढतीत मध्य प्रदेशच्या ज्योतीवर ४-० असा विजय मिळवला.

विनेशने या स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचे प्रतिनिधित्व केले. दरम्यान विनेशने २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच, २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने विजय मिळवला होता.

विनेशला साक्षी मलिकने सुवर्णपदक प्रदान केले

या सामन्यातील विजयानंतर विनेश फोगटला ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने सुवर्णपदक प्रदान केले.

दरम्यान, विनेश, साक्षी आणि बजरंग पुनिया यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध आंदोलन केले होते, यानंतर ब्रिजभूषण यांना आपले पद सोडावे लागले होते.

या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात, २०२१ वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेती हरियाणाच्या अंशू मलिकने ५९ किलो वजनी गटात २०२० आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेती सरिता मोर (रेल्वे) हिचा ८-३ असा पराभव केला.

हरियाणाने या स्पर्धेत १८९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले.तर रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (RSPB) १८७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. यानंतर पुद्दुचेरीला ८१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या ग्रीको-रोमन प्रकारात, RSPB २०८ गुणांसह एकूण विजेता ठरला, त्यानंतर आर्मी स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (१२७ गुण) आणि महाराष्ट्र (११३ गुण) तिसऱ्या स्थानावर राहिला.

पुढील बातम्या