मराठी बातम्या  /  क्रीडा  /  विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला, पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात काय? पाहा

विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला, पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात काय? पाहा

Dec 26, 2023, 08:57 PM IST

    • Vinesh Phogat Returns Khel Ratna And Arjuna Award : महिला कुस्तीपटू विनेश फोगटने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. विनेशच्या आधी बजरंग पुनियानेही पद्मश्री पुरस्कार परत केला होता.
Vinesh Phogat Returns Khel Ratna (PTI)

Vinesh Phogat Returns Khel Ratna And Arjuna Award : महिला कुस्तीपटू विनेश फोगटने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. विनेशच्या आधी बजरंग पुनियानेही पद्मश्री पुरस्कार परत केला होता.

    • Vinesh Phogat Returns Khel Ratna And Arjuna Award : महिला कुस्तीपटू विनेश फोगटने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. विनेशच्या आधी बजरंग पुनियानेही पद्मश्री पुरस्कार परत केला होता.

Vinesh Phogat Returns Khel Ratna : महिला कुस्तीपटू विनेश फोगटने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. सोशल मीडियावर तिने ही माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सोशल मीडियावर पोस्ट करत तिने लिहिले आहे की, "मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे. मला या परिस्थितीत आणल्याबद्दल ताकदवान लोकांचे खूप खूप आभार."

यासोबतच विनेशने पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राचा फोटोही शेअर केला आहे. विनेशच्या आधी बजरंग पुनियानेही पद्मश्री पुरस्कार परत केला होता. तर साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.

विनेश फोगटला २०१६ मध्ये अर्जुन पुरस्कार तर २०२० मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. खेलरत्न हा खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन

भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक २१ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर साक्षी मलिकने कुस्तीतून संन्यास घेत म्हटले की, ब्रिजभूषण सारख्या व्यक्तीची पुन्हा निवड झाली तर काय करायचे?

यानंतर बजरंग पुनिया यानेही संजय सिंह यांच्या निषेधार्थ पद्मश्री परत केला आणि आता विनेशने तिचा खेलरत्न परत केला आहे.

विनेश फोगटच्या पत्रात नेमकं काय?

विनेश फोगटने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपला खेलरत्न परत केला आहे. या पत्रात तिने लिहिले आहे की, "माननीय पंतप्रधान, साक्षी मलिक हिने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री परत केला आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सर्व करण्यास का भाग पाडले गेले? संपूर्ण देशाला याची माहिती आहे आणि तुम्ही देशाचे प्रमुख असल्याने ही बाब तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल.

माननीय पंतप्रधान, मी विनेश फोगट आहे, तुमच्या घरची मुलगी आहे आणि गेल्या एक वर्षापासून माझी काय स्थिती आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे.

आमच्यासाठी ५ मिनिटे काढा

विनेशने पुढे लिहिले की, तुम्ही तुमच्या आयुष्यातील ५ मिनिटे काढा आणि त्या व्यक्तीने मीडियात दिलेली विधाने ऐका, तुम्हाला कळेल की त्याने काय केले आहे. त्याने महिला कुस्तीपटूंना 'मंथरा' म्हटले आहे, टीव्हीवर महिला कुस्तीपटूंना उद्धवस्त करण्याची कबुली दिली आहे आणि आम्हा महिलांना अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही. याहून गंभीर बाब म्हणजे किती महिला कुस्तीपटूंना मागे हटण्यास भाग पाडले. हे खूप भीतीदायक आहे'.

माझा जीव आता गुदमरतोय'

या सर्व घटना विसरण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण ते इतके सोपे नाही. सर, जेव्हा मी तुम्हाला भेटले तेव्हा मी तुम्हाला हे सर्व सांगितले. न्यायासाठी आम्ही वर्षभरापासून रस्त्यावर आहोत. आमची काळजी कोणी घेत नाही. आमची पदके आणि पुरस्कारांची किंमत १५ रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पण ही पदके आपल्याला आपल्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत. जेव्हा आम्ही देशासाठी पदके जिंकली तेव्हा संपूर्ण देशाला आमचा अभिमान वाटायचा. आता आम्ही आमच्या न्यायासाठी आवाज उठवल्याने आम्हाला देशद्रोही म्हटले जात आहे.

पुरस्करांचा आता माझ्या आयुष्यात काहीच अर्थ नाही

विनेशने पुढे लिहिले, 'अनेकवेळा मला या विचाराने भीती वाटते की, जेव्हा माझ्या घरचे लोक आमची अवस्था टीव्हीवर पाहत असतील, तेव्हा त्यांना काय वाटेल? भारतातील कोणत्याही आईला आपल्या मुलीची अशी अवस्था व्हावी असे वाटत नाही. मला मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार देण्यात आला. या पुरस्करांचा आता माझ्या आयुष्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येक स्त्रीला आयुष्य सन्मानाने जगायचे असते.

त्यामुळे पंतप्रधान महोदय, मला माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करायचा आहे, जेणेकरून सन्मानाने जगण्याच्या मार्गात हे पुरस्कार आपल्यावर ओझे बनू नयेत."

पुढील बातम्या