मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sakshi Malik : ब्रिजभूषण यांचा सहकारी कुस्ती महासंघाचा नवा अध्यक्ष, साक्षी मलिकने रडत-रडत घेतली निवृत्ती

Sakshi Malik : ब्रिजभूषण यांचा सहकारी कुस्ती महासंघाचा नवा अध्यक्ष, साक्षी मलिकने रडत-रडत घेतली निवृत्ती

Dec 21, 2023, 09:37 PM IST

    • Sakshi Malik Retirement : या वर्षी भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात अनेकदा आंदोलने केली होती. त्यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत.
Sakshi Malik Retirement (PTI)

Sakshi Malik Retirement : या वर्षी भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात अनेकदा आंदोलने केली होती. त्यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत.

    • Sakshi Malik Retirement : या वर्षी भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात अनेकदा आंदोलने केली होती. त्यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत.

Sakshi Malik Announces Retirement From Wrestling : भारताची अनुभवी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक आज गुरुवारी (२१ डिसेंबर) पार पडली. या निवडणूकीत संजय सिंह निवडून आले आणि नवे अध्यक्ष झाले आहेत. ही अध्यक्षपदाची निवडणूक संजय सिंह आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती अनिता शेओरान यांच्यात झाली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

विशेष म्हणजे नवे अध्यक्ष संजय सिंग हे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे साक्षी मलिकने अतिशय भावूक होत कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.

दरम्यान, या वर्षी भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात अनेकदा आंदोलने केली होती. त्यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत.

साक्षीने रडत रडतच निवृत्ती जाहीर केली

साक्षी मलिकसह बजरंग पुनिया आणि बबिता फोगट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांना विरोध केला होता. पण आता त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यानेच निवडणूक जिंकल्यानंतर साक्षीने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडियाशी संवाद साधताना साक्षीला अश्रू आवरले नाहीत. ती म्हणाली की, ‘आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशाच्या अनेक भागातून अनेक लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. ब्रिजभूषण सिंग यांचे व्यावसायिक भागीदार आणि जवळचे सहकारी WFI चे अध्यक्ष राहिले तर मी माझी कुस्ती सोडून देईन. मी तुम्हाला या ठिकाणी कधीही दिसणार नाही’.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप

१८ जानेवारी रोजी भारतीय कुस्तीचे ३ मोठे कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि बबिता फोगट यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले. त्यांच्यासोबत इतर अनेक युवा पैलवान होते. कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब़ृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ आणि विनयभंगाचे आरोप केले होते. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी २१ जानेवारीला आंदोलन मागे घेतले.

एप्रिलमध्ये पुन्हा आंदोलन

ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने एप्रिलमध्ये आपला अहवाल सादर केला, पण तो सार्वजनिक करण्यात आला नाही. दरम्यान, अहवालात ब्रिजभूषण निर्दोष असल्याचे वृत्त समोर आले आहे. २३ एप्रिल रोजी कुस्तीपटू दुसऱ्यांदा संपावर बसले. पैलवानांनी जंतरमंतरवरच तळ ठोकला आणि रात्रंदिवस आंदोलन सुरू राहिले

पुढील बातम्या