मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI vs UP WPL 2023 Highlights : मुंबई इंडियन्स फायनलमध्ये, एलिमिनेटर सामन्यात युपीचा पराभव

MI vs UP WPL 2023 Highlights : मुंबई इंडियन्स फायनलमध्ये, एलिमिनेटर सामन्यात युपीचा पराभव

Mar 24, 2023, 10:49 PM IST

  • UP Vs MI highlights wpl 2023 : महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली. आता २६ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. 

UP Vs MI highlights wpl 2023

UP Vs MI highlights wpl 2023 : महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली. आता २६ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

  • UP Vs MI highlights wpl 2023 : महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली. आता २६ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. 

UP Vs MI highlights wpl 2023 : महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली. आता २६ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीचा संघ १७.४ षटकांत ११० धावांवर गारद झाला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

नताली स्कायव्हर ब्रंटच्या नाबाद ७२ आणि इस्सी वोंगच्या हॅट्ट्रिकमुळे मुंबईने शानदार विजय मिळवला. इस्‍सी वाँगने चार षटकांत १५ धावा देत ४ बळी घेतले. महिला प्रीमियर लीगमध्ये हॅट्ट्रिक घेणारी ती पहिली खेळाडू ठरली. तिने किरण नवगिरे, सिमरन शेख आणि सोफी एक्लेस्टोनला बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

यूपीकडून किरण नवगिरे एकाकी लढत दिली. तिने २७ चेंडूत ४३ धावा केल्या. तिला दुसऱ्या टोकाकडूनही साथ मिळाली नाही. दीप्ती शर्मा १६ , ग्रेस हॅरिस १४ आणि अॅलिसा हिली ११ धावा करून बाद झाल्या. यूपीच्या ११ फलंदाजांपैकी फक्त ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. मुंबईकडून इस्‍सी वोंग व्यतिरिक्त सायका इशाकने दोन बळी घेतले. नताली सीव्हर, हेली मॅथ्यूज आणि जय कलिता यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

मुंबईचा डाव

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या होत्या. त्यांच्यासाठी नताली सीव्हर ब्रंटने शानदार खेळी केली. तिने ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. यादरम्यान तिच्या बॅटमधून ९ चौकार आणि २ षटकार निघाले.

यानंतर अमेलिया केरने १९ चेंडूत २९, हीली मॅथ्यूजने २६ चेंडूत २६ आणि यास्तिका भाटियाने १८ चेंडूत २१ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने १५ चेंडूत १४ धावा केल्या. पूजा वस्त्राकरने ४ चेंडूत ११ धावा करून नाबाद राहिली. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने दोन बळी घेतले. अंजली सरवानी आणि पार्श्वी चोप्रा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

पुढील बातम्या