मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Wrestling Federation India : भारताच्या कुस्ती क्षेत्राला मोठा हादरा; कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द

Wrestling Federation India : भारताच्या कुस्ती क्षेत्राला मोठा हादरा; कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द

Aug 24, 2023, 03:11 PM IST

    • United World Wrestling : जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
indian wrestling federation suspended (AFP)

United World Wrestling : जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

    • United World Wrestling : जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

indian wrestling federation suspended : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठरलेल्या वेळेत निवडणुका पार न पाडल्यामुळं युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यपद रद्द करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. रेसलिंग बॉडीने कुस्ती महासंघाला काही दिवसांपूर्वीच निवडणूक पार पाडण्यासाठी सूचना केली होती. परंतु तरीदेखील निवडणूक न झाल्याने कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं हा भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघ सतत वादाच्या भोवऱ्यात होता.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी भारतीय कुस्ती महासंघाला निवडणूक घेण्यासाठीची नोटीस जारी केली होती. निवडणुका झाल्या नाही तर महासंघाचं सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असंही युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आलं होतं. परंतु त्याकडे क्रीडा मंत्रालयाने साफ दुर्लक्ष केल्यामुळं कुस्ती महासंघाचं सदस्यत्व गेल्याचं बोललं जात आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर नवख्या महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघांच्या सदस्यांना निलंबित करण्याची कारवाई केली.

प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली. तसेच निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्राकडून काश्मीरचे माजी न्यायाधीश एमएम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु वेळेत निवडणूक प्रक्रिया पार न पाडल्यामुळं भारतीय कुस्ती महासंघाचं जागतिक अध्यक्षपद रद्द करण्यात आलं आहे. नियोजित वेळेनुसार भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका ११ जुलै रोजी होणार होत्या. परंतु त्याचवेळी आसाम रेसलिंग असोसिएशनने मान्यतेच्या मागणीसाठी हायकोर्टात धाव घेतली.

त्यानंतर कोर्टाने कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १२ ऑगस्ट ही निवडणुकीसाठीची नवी तारीख जाहीर करण्यात आली. परंतु त्यावेळी हरयाणा कुस्ती महासंघाने निवडणुकांवर स्थगिती आणण्यासाठीची याचिका चंदीगड हायकोर्टात दाखल केली. त्यामुळं ऑगस्ट महिन्यात होणारी निवडणूक स्थगित झाली. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा अर्ज दाखल केला होता. परंतु वारंवार निवडणुका स्थगित होत असल्यामुळं जागतिक वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

पुढील बातम्या