मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Umran Malik: रफ्तार से गिरफ्तार... उमरानचा चेंडू दिसलाच नाही! १५५ च्या स्पीडचा विक्रम मोडला

Umran Malik: रफ्तार से गिरफ्तार... उमरानचा चेंडू दिसलाच नाही! १५५ च्या स्पीडचा विक्रम मोडला

Jan 10, 2023, 08:38 PM IST

    • umran malik 156 kmph,India vs Sri Lanka 1st odi: उमरान मलिकने पुन्हा एकदा आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गुवाहाटी येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात त्याने आपलाच पूर्वीचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात त्याने १५६ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे.
Umran Malik

umran malik 156 kmph,India vs Sri Lanka 1st odi: उमरान मलिकने पुन्हा एकदा आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गुवाहाटी येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात त्याने आपलाच पूर्वीचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात त्याने १५६ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे.

    • umran malik 156 kmph,India vs Sri Lanka 1st odi: उमरान मलिकने पुन्हा एकदा आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गुवाहाटी येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात त्याने आपलाच पूर्वीचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात त्याने १५६ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे.

India vs Sri Lanka (IND vs SL) 1st ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर ३७४धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

प्रत्युत्तरात श्रीलंकेची अवस्था बिकट झाली आहे. हे वृत्त लिहिपर्यंत श्रीलंकेच्या ३६.३ षटकात ७ बाद २०० धावा झाल्या आहेत.

उमरानने टाकला १५६च्या स्पीडने चेंडू

दरम्यान, या सामन्यात उमरान मलिकने पुन्हा एकदा आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गुवाहाटी येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात त्याने आपलाच पूर्वीचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात त्याने १५६ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू होता. यापूर्वीही हा विक्रम उमरान मलिकच्या नावावर होता. त्याने स्वतःचाच विक्रम मोडला.

उमरानने यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत १५५ च्या वेगाने चेंडू टाकला होता. टी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने हा चेंडू श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला टाकला होता. आता या सामन्यात उमरानने त्याच्या दुसऱ्या षटकात १५६ च्या स्पीडने चेंडू टाकला.

श्रीनाथने १५४ च्या स्पीडने चेंडू टाकला होता.

विशेष म्हणजे उमरान मलिकच्या आधी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम जवागल श्रीनाथच्या नावावर होता. १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने १५४.५ च्या वेगाने चेंडू टाकला होता. आता उमरान मलिकने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

याशिवाय सर्वात वेगवान चेंडू फेकण्याच्या बाबतीत इरफान पठाण तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने १५३.७ च्या स्पीडने चेंडू टाकला होता. त्यानंतर मोहम्मद शमी १५३.३ चौथ्या, जसप्रीत बुमराह १५३.२६ पाचव्या, इशांत शर्मा १५३.२६ सहाव्या क्रमांकावर आहेत.

पुढील बातम्या