मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Umran Malik: हे काय नवीन? ‘या’ कारणामुळं हुकली उमरानची वर्ल्डकप वारी; BCCI चं स्पष्टीकरण

Umran Malik: हे काय नवीन? ‘या’ कारणामुळं हुकली उमरानची वर्ल्डकप वारी; BCCI चं स्पष्टीकरण

Oct 13, 2022, 12:18 PM IST

    • Umran malik - Kuldeep sen Visa Delay: उमरान मलिक आणि कुलदीप सेन यांना अद्याप ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळालेला नाही. यानंतर बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंच्या जागी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
Umran malik

Umran malik - Kuldeep sen Visa Delay: उमरान मलिक आणि कुलदीप सेन यांना अद्याप ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळालेला नाही. यानंतर बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंच्या जागी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

    • Umran malik - Kuldeep sen Visa Delay: उमरान मलिक आणि कुलदीप सेन यांना अद्याप ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळालेला नाही. यानंतर बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंच्या जागी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL मध्ये अप्रतिम कामगिरी करणारे वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि कुलदीप सेन व्हिसा न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाला जाऊ शकणार नाहीत. या दोन्ही खेळाडूंची ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक खेळणाऱ्या संघात नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती, परंतु व्हिसा न मिळाल्याने त्यांची नावे मागे घेतली जाऊ शकतात. या दोन्ही युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळण्यास अधिक वेळ लागत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

फलंदाजांना सराव करण्यासाठी चार वेगवान गोलंदाजांची नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती. यात उमरान मलिकशिवाय कुलदीप सेन, चेतन सकारिया आणि मुकेश चौधरी यांचा समावेश होता. हे चौघेही भारतीय मुख्य संघासोबत पर्थमध्ये सराव करणार होते. सकारिया आणि मुकेश चौधरी संघातील उर्वरित खेळाडूंसह आधीच ऑस्ट्रेलियाला पोहोचले असून ते सरावही करत ​​आहेत. चेतन आणि मुकेश यांच्याकडे ऑस्ट्रेलियाचा व्हिसा होता, परंतु कुलदीप आणि उमरान यांना व्हिसा मिळू शकला नाही, त्यामुळे हे दोन्ही खेळाडू भारतातच आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुलदीप सेन आणि उमरान मलिक यांना व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे आता बीसीसीआयने आपला निर्णय बदलला आहे. या दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणार नाही. त्यांच्या जागी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

व्हिसा का मिळाला नाही?

आयसीसीच्या नियमांनुसार, प्रत्येक संघातील १५ प्रमुख खेळाडू आणि राखीव खेळाडूंना लवकर व्हिसा देण्याची तरतूद आहे. परंतु नेट गोलंदाजांसाठी असा कोणताही नियम नाही. मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपर चहर यांचा भारताच्या संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, नंतर चहर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला.

उमरान मलिक आणि कुलदीप सेन अधिकृत यादीत नव्हते, त्यामुळे त्यांच्या व्हिसाच्या प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. भारतीय संघ ५ ऑक्टोबरला पर्थला रवाना झाला. उमरान आणि कुलदीपही मुंबईतील टीम हॉटेलमध्ये पोहोचले. आपला व्हिसा येईल या आशेने त्यांना तिथे राहण्यास सांगितले होते, पण तसे झाले नाही. त्यानंतर दोन्ही खेळाडू घरी परतले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी जम्मू-काश्मीर संघात मलिकचा समावेश करण्यात आला आहे.

BCCI चं स्पष्टीकरण

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "ते (मलिक आणि कुलदीप) आता (ऑस्ट्रेलिया) जाणार नाहीत. कारण १७ ऑक्टोबरनंतर आयसीसी स्वता: नेट बॉलर पुरवणार आहे. आम्ही त्यांच्या व्हिसासाठी प्रयत्न केले पण वेळेत व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे उमरानला आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळण्यास सांगितले आहे.

पुढील बातम्या