मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Udaypur Murder: उदयपूर घटनेवर इरफान पठाणचे ट्वीट, चाहते भडकले

Udaypur Murder: उदयपूर घटनेवर इरफान पठाणचे ट्वीट, चाहते भडकले

Jun 29, 2022, 12:27 PM IST

    • मोहम्मद पैंगबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ चुकून केलेल्या पोस्टमुळे कट्टरपंथियांनी कन्हैयालालची गळा चिरून हत्या केली.
उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालची हत्या (फोटो - पीटीआय)

मोहम्मद पैंगबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ चुकून केलेल्या पोस्टमुळे कट्टरपंथियांनी कन्हैयालालची गळा चिरून हत्या केली.

    • मोहम्मद पैंगबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ चुकून केलेल्या पोस्टमुळे कट्टरपंथियांनी कन्हैयालालची गळा चिरून हत्या केली.

राजस्थानच्या (Rajsthan) उदयपूरमध्ये  (Udaypur) मंगळवारी दुपारी एका टेलरचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्या. भरदुपारी दुकानात घुसून टेलरवर हल्ला केला गेला आणि त्यानंतर गळा चिरून हत्या करण्यात आली. मोहम्मद पैंगबर (Prophet Muhammad) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ चुकून केलेल्या पोस्टमुळे कट्टरपंथियांनी कन्हैयालालची (Kanhaiya Lal) हत्या केली. कपडे शिवायचे असल्याचं सांगत दोन्ही आरोपी दुकानात शिरले होते. त्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडीओसुद्धा केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) निषेध करणारं ट्वीट केलं आहे. मात्र तरीही त्याच्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

इरफान पठाणने या घटनेसंदर्भात ट्विटरवर म्हटलं की, "तुम्ही कोणता धर्म मानता याने काही फरक पडत नाही. एखाद्या निर्दोष व्यक्तीला इजा पोहोचवण्याचा अर्थ तुम्ही पूर्ण मानवतेला इजा करताय." इरफान पठाणने यात धर्माचा उल्लेख टाळला असल्यानं चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

इरफान पठाणणे पहिल्यांदाच अशा पद्धतीने एखाद्या घटनेवर ट्वीट केलंय असं नाही. याआधीही अनेकदा इरफान पठाणने हिंसाचाराच्या घटनांविरोधात मत व्यक्त केलं आहे.

<p>इरफान पठाण ट्विटर</p>

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ चुकून कन्हैयालाल यांच्या फोनवरून एक पोस्ट झाली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानतंर कन्हैयालाल विरोधात पोलिसात दतक्रारही दाखल झाली होती. त्याच्यावर कारवाई करत कन्हैय्यालालला पोलिसांनी अटकही केली होती. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटाक केली होती. त्यानंतर कन्हैयालालने आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षेची मागणी केली होती. आता यावरून उदयपूर पोलिसांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली जात आहे.

विभाग

पुढील बातम्या