मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Tom Lockyer Cardiac Arrest : फुटबॉल सामन्यात कर्णधाराला हार्ट अटॅक, चाहते रडले, खेळाडूंची मैदानावर प्रार्थना, पाहा

Tom Lockyer Cardiac Arrest : फुटबॉल सामन्यात कर्णधाराला हार्ट अटॅक, चाहते रडले, खेळाडूंची मैदानावर प्रार्थना, पाहा

Dec 17, 2023, 01:51 PM IST

    • Tom Lockyer Cardiac Arrest : सामना सुरू असतानाच ल्युटन टाऊनचा कर्णधार टॉम लॉकियर (२९) याला हृदयविकाराचा झटका आला. तो मैदानावरच कोसळला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
Tom Lockyer Cardiac Arrest (REUTERS)

Tom Lockyer Cardiac Arrest : सामना सुरू असतानाच ल्युटन टाऊनचा कर्णधार टॉम लॉकियर (२९) याला हृदयविकाराचा झटका आला. तो मैदानावरच कोसळला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

    • Tom Lockyer Cardiac Arrest : सामना सुरू असतानाच ल्युटन टाऊनचा कर्णधार टॉम लॉकियर (२९) याला हृदयविकाराचा झटका आला. तो मैदानावरच कोसळला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

Tom Lockyer Cardiac Arrest during EPL match : इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (EPL 2023) शनिवारी (१६ डिसेंबर) ल्युटन टाऊन आणि बोर्नमाउथ हे संघ आमनेसामने होते. दोन्ही संघातील हा सामना डोरसेट येथील व्हिटॅलिटी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वास्तविक, सामना सुरू असतानाच ल्युटन टाऊनचा कर्णधार टॉम लॉकियर (२९) याला हृदयविकाराचा झटका आला. तो मैदानावरच कोसळला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता टॉमची प्रकृती स्थिर आहे. 

यानंतर काही वेळाने सामना रद्द करण्यात आला. लॉकियरवर हृदय शस्त्रक्रिया झाली आहे.

सामना रद्द

विशेष म्हणजे, ल्युटनचा कर्णधार टॉम लॉकियर यावर्षी दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आल्याने मैदानावर कोसळला. अशा परिस्थितीत बोर्नमाउथ येथे खेळल्या जाणाऱ्या इंग्लिश प्रीमियर लीग (EPL) फुटबॉल स्पर्धेचा सामना रद्द करावा लागला. 

सामन्याच्या ५९व्या मिनिटाला बचावपटू टॉम लॉकियर मैदानात कोसळला. यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू लगेच त्याच्याजवळ पोहोचले. ल्युटनचे प्रशिक्षक रॉब एडवर्ड्सही लगेच मैदानात उतरले. ते बराच चिंतेत दिसत होते. 

टॉम लॉकियरच्या समर्थनार्थ घोषणा

यानंतर टॉम लॉकियर याला मैदानावर उपचार देण्यात आले आणि नंतर त्याला स्ट्रेचरवर बाहेर काढण्यात आले.

तोपर्यंत त्याची प्रकृती थोडी सुधारली होती. त्यावेळी सामना १-१ असा बरोबरीत होता आणि रेफ्री सायमन हूपर यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना रद्द झाल्यानंतरही प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. ते लॉकियर यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते.

दरम्यान, सामना रद्द झाल्यानंतर ल्युटन क्लबने एका निवेदनात सांगितले की, 'आम्ही दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी दिलगीर आहोत, परंतु दोन्ही संघांचे खेळाडू त्यांच्या सहकारी आणि मित्राने अशा प्रकारे मैदान सोडल्यानंतर खेळ सुरू ठेवण्याच्या स्थितीत नव्हते.'

मे महिन्यातही लॉकियरला झटका आला होता

लॉकियर याआधी वेम्बले येथेही सामन्यादरम्यान कोसळला होता. मे महिन्यात कॉव्हेंट्री क्लबविरुद्धच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली. नंतर त्याला खेळण्याची परवानगी मिळाली होती. जूनमध्ये तो पुन्हा मैदानात परतला. त्याने जूनमध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, मला अशक्तपणा जाणवत होता. त्याला वाटले की त्याचे पाय अशक्त झाले आहेत.

 

पुढील बातम्या