मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ICC Team Rankings : टीम इंडियाचा इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, कसोटीसह टी-ट्वेंटीत मिळवलं पहिलं स्थान

ICC Team Rankings : टीम इंडियाचा इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, कसोटीसह टी-ट्वेंटीत मिळवलं पहिलं स्थान

Aug 04, 2023, 06:57 PM IST

    • ICC Team Rankings List : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मागे सोडत आयसीसीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
Ahmedabad: Indian team members celebrate the wicket of Usman Khawaja (L) during the 2nd day of the fourth test cricket match between India and Australia, at Narendra Modi stadium in Ahmedabad, Friday, March 10, 2023. (PTI Photo/Atul Yadav)(PTI03_10_2023_000139B) (PTI)

ICC Team Rankings List : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मागे सोडत आयसीसीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

    • ICC Team Rankings List : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला मागे सोडत आयसीसीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

ICC Cricket Team Rankings 2023 : गेल्या तीन वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघ टी-ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळं आता त्याचा फायदा टीम इंडियाला आयसीसीच्या क्रमवारीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने नुकत्याच जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय संघाने टी-ट्वेंटी आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आहे. टी-ट्वेंटीत २६७ आणि कसोटीत १२१ गुणांसह टीम इंडियाने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्यामुळं आता ऐन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या आधीच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या टी-ट्वेंटी क्रमवारीत भारतीय संघाने इंग्लंडला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे. याशिवाय कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. टी-ट्वेंटीत २६७ गुणांसह भारत पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा क्रमांक लागतो. याशिवाय कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत भारत पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्यामुळं आता कसोटीतील दोन दिग्गज संघांमध्ये येत्या जूनमध्ये विश्वचषकासाठी लढत होणार आहे.

GT vs DC IPL 2023 : आयपीएलमध्ये आज गुजरात आणि दिल्लीत रंगणार सामना, कोण मारणार बाजी?

भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव हा गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात नाहीये. यंदाच्या आयपीएलमध्येही त्याला सूर गवसलेला नाही. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये त्याने टी-ट्वेंटीत केलेल्या चमकदार कामगिरीमुळं टी-ट्वेंटीच्या क्रमवारीत पहिलं स्थान कायम राखलं आहे. त्यामुळं आता कसोटी, टी-ट्वेंटीत टीम इंडियाने आपला दबदबा कायम राखला आहे.

पुढील बातम्या