मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ICC T20 Cricket Rating: टी-२० वर्ल्डकप जिंकूनही इंग्लंडला जमली नाही 'ही' गोष्ट; टीम इंडियाच सरस

ICC T20 Cricket Rating: टी-२० वर्ल्डकप जिंकूनही इंग्लंडला जमली नाही 'ही' गोष्ट; टीम इंडियाच सरस

Nov 17, 2022, 11:56 AM IST

  • ICC T20 Cricket Rating: इंग्लंड संघानं टी-२० विश्वचषक जिंकला खरा, पण विजयाचा निर्भेळ आनंद त्यांना मिळू शकला नाही. कारण…

India Vs England

ICC T20 Cricket Rating: इंग्लंड संघानं टी-२० विश्वचषक जिंकला खरा, पण विजयाचा निर्भेळ आनंद त्यांना मिळू शकला नाही. कारण…

  • ICC T20 Cricket Rating: इंग्लंड संघानं टी-२० विश्वचषक जिंकला खरा, पण विजयाचा निर्भेळ आनंद त्यांना मिळू शकला नाही. कारण…

ICC T20 Cricket Rating: ऑस्ट्रेलियात नुकतीच पार पडलेली टी २० विश्वचषक स्पर्धा इंग्लंडच्या संघानं जिंकली. कागदावर मजबूत भासणारा व विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ अंतिम फेरीही गाठू शकला नाही. असं असलं तरी पुरुषांच्या आयसीसी टी२० क्रमवारीत इंग्लंडला अद्यापही पहिला क्रमांक पटकावता आलेला नाही. टीम इंडिया या स्थानी कायम आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

टी-२० क्रिकेट प्रकारातील सर्वोत्त्कृष्ट संघांच्या आयसीसीच्या क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर आहे. विश्वचषक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळं इंग्लंडनं आता दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. भारत आणि इंग्लंडमधील अंतर खूपच कमी झालं आहे. मात्र, भारतीय संघ १८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यामुळं भारताला आघाडी कायम राखण्याची पुरेपूर संधी आहे.

टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारत (२६८) पाच गुणांनी इंग्लंडच्या (२६३) पुढं होता. मात्र, आता हे अंतर कमी झालं आहे. आता इंग्लंडचा संघ भारतापेक्षा केवळ तीन गुणांनी पिछाडीवर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं टी-२० विश्वचषकाच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये पाच पैकी चार सामने जिंकले होते, तर इंग्लंडनं केवळ तीन सामने जिंकले होते, परंतु उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला आणि इंग्लंडनं अंतिम फेरीतही विजय मिळवला. त्यामुळं इंग्लंडच्या खात्यात काही अतिरिक्त गुणांची भर पडून हा फरक कमी झाला आहे.

सध्या भारत २६८ गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून इंग्लंडच्या खात्यात २६५ गुण जमा आहेत. अशा प्रकारे इंग्लिश संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानी संघ आहे. मात्र, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकातील गुणसंख्येत बरेच अंतर आहे. पाकिस्तानच्या खात्यात केवळ २५८ गुण आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिका (२५६), न्यूझीलंड (२५३) आणि ऑस्ट्रेलिया (२५२) आहेत. 

पाकिस्तानचा उलटा प्रवास

टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली तेव्हा, पाकिस्तानच्या खात्यात २५९ गुण होते. त्यानंतर पाकिस्ताननं अंतिम फेरीपर्यंतही मजल मारली. पण पाकिस्तानचे गुण वाढण्याऐवजी घटले. पाकिस्ताननं स्पर्धेतील सहा पैकी तीन सामनं गमावल्यामुळं त्यांची गुणसंख्या २५८ वर घसरली.

पुढील बातम्या