मराठी बातम्या  /  क्रीडा  /  मैदानावरच नमाज पठण करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर माजी क्रिकेटपटू भडकला, म्हणाला...

मैदानावरच नमाज पठण करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर माजी क्रिकेटपटू भडकला, म्हणाला...

Nov 15, 2022, 05:49 PM IST

  • zulqarnain haider over Namaz on Cricket Ground: क्रिकेटच्या मैदानावरच नमाज पठण करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना पाकच्या माजी क्रिकेटपटूनं कठोर शब्दांत सुनावलं आहे.

Zulqarnain Haider

zulqarnain haider over Namaz on Cricket Ground: क्रिकेटच्या मैदानावरच नमाज पठण करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना पाकच्या माजी क्रिकेटपटूनं कठोर शब्दांत सुनावलं आहे.

  • zulqarnain haider over Namaz on Cricket Ground: क्रिकेटच्या मैदानावरच नमाज पठण करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना पाकच्या माजी क्रिकेटपटूनं कठोर शब्दांत सुनावलं आहे.

ICC T20 World Cup 2022: विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवावरून पाकिस्तानी संघ आता त्यांच्याच देशातील माजी क्रिकेटपटूंच्या रडारवर आला आहे. माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर यानं पाकिस्तानी संघाची लायकी काढल्यानंतर आता माजी क्रिकेटपटू झुल्करेन हैदर यानं नमाजाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानी संघातील खेळाडूंना फटकारलं आहे. त्याचा रोख पाकचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान याच्याकडं असल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पाकिस्तानी संघातील काही खेळाडू हे विजयानंतर किंवा मोठ्या यशानंतर मैदानात नमाज पढून आनंद व्यक्त करत असतात. यापूर्वी हे अनेकदा दिसून आलं आहे. पाकिस्तानी संघाचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान हा देखील अर्धशतक किंवा शतक झळकावल्यानंतर यापूर्वी मैदानावरच नमाज पठण करताना दिसला होता. एका भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना झुल्करेन हैदरनं याच मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

'आता कुठं गेली तुमची प्रार्थना? मैदानावर तुम्ही प्रार्थना करता, मग फायनल का जिंकला नाहीत? एक जण १५ धावांवर आऊट झाला, एक १४ वर आऊट झाला. कुणी कुठे गेले, कुणी कुठे गेले? तुम्हाला स्वत:साठी प्रार्थना करण्याची गरज आहे. तुमच्या श्रद्धेसाठी तुम्हाला प्रार्थना करायची असते, धर्मासाठी नाही. दिखावा म्हणून हे सगळं करायचं नसतं. तुमच्या प्रार्थनेमुळं इंग्लंडचे मोईन अली आणि आदिल रशिद हे दोन मुसलमान जिंकले. कारण ते तुमच्यापेक्षा चांगले मुस्लिम आहेत. ते मैदानावर दिखावा करत नाहीत, असंही हैदर यानं पाकिस्तानी खेळाडूंना सुनावलं.

हैदर यानं दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला याचाही दाखला दिला. तो म्हणाला, 'फोटोत दिसण्यासाठी हाशिम आमला हा मैदानावर नमाज अदा करत नाही, कारण तो मैदानाबाहेर चांगला मुस्लिम आहे. तुम्ही झिम्बाब्वेकडूनही हरला, त्यामुळं आता तुमच्यासाठीच प्रार्थना करावी लागेल. तुम्ही फायनलमध्ये पोहोचला याबद्दल अल्लाहचे आभार मानायला हवेत.'

विभाग

पुढील बातम्या