मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup: पाकिस्तानी अभिनेत्री म्हणते, भारत हरला तर झिम्बॉब्वेच्या नागरिकाशी लग्न करेन

T20 World Cup: पाकिस्तानी अभिनेत्री म्हणते, भारत हरला तर झिम्बॉब्वेच्या नागरिकाशी लग्न करेन

Nov 03, 2022, 03:19 PM IST

    • T20 World Cup: टी२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव व्हावा यासाठी पाकिस्तानी अभिनेत्री प्रार्थना करत होती.
सहर शिनवारी

T20 World Cup: टी२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव व्हावा यासाठी पाकिस्तानी अभिनेत्री प्रार्थना करत होती.

    • T20 World Cup: टी२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव व्हावा यासाठी पाकिस्तानी अभिनेत्री प्रार्थना करत होती.

T20 World Cup: पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी ही तिच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असते. टी२० वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव व्हावा यासाठी पाकिस्तानी अभिनेत्री प्रार्थना करत होती. इतका पाऊस व्हावा की भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा वाहून जाव्यात असं तिने म्हटलं होतं. मात्र भारताने बांगलादेशला ५ धावांनी हरवलं. बांगलादेशच्या पराभवाने पाकिस्तानची सेमीफायनलची वाट खडतर झाली आहे. आता मोठा चमत्कारच पाकिस्तानला सेमीफायनलमद्ये पोहोचवू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सहन शिनवारीने आता भारत झिम्बॉब्वे यांच्या सामन्याबद्दल ट्विट केलं आहे. तिच्या या ट्विटची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे. शिनवारीने म्हटलं की, जर झिम्बॉब्लेच्या टीमने कमाल केली आणि भारताला पुढच्या सामन्यात हरवल तर मी झिम्बॉब्वेच्या नागरिकाशी लग्न करेन. सरच्या या ट्विटवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने मी झिम्बॉब्वेचा आहे असं म्हटलं तर दुसऱ्या एकाने झिम्बॉब्वतल्या कुणाला तुझ्याशी लग्न करायचं आहे का? असं विचारलं आहे.

सहर शिनवारीने भारताबद्दल असं ट्विट करण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही तिने एका ट्विटमध्ये लिहिलं होतं की, भारत प्रामाणिकपणे हा सामना जिंकला असता तर मी माझं नाव नरेंद्र मोदी असं केलं असतं. इतकंच नाही तर बीसीसीआयवरसुद्धा तिने आरोप केले होते. तुम्ही आम्दाला जिंकू देणार नाही तर मी बॅट आणि बॉल दोन्ही घेऊ. तुम्हाला खेळू देणार नाही अशी बीसीसीआयची भूमिका असते असं सहर म्हणाली होती.

पुढील बातम्या