मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Natarajan Cricket Ground : नटराजननं स्वप्न खरं करून दाखवलं, या गावात बांधलं क्रिकेट स्टेडियम, कार्तिकनं केलं उद्घाटन

Natarajan Cricket Ground : नटराजननं स्वप्न खरं करून दाखवलं, या गावात बांधलं क्रिकेट स्टेडियम, कार्तिकनं केलं उद्घाटन

Jun 25, 2023, 02:20 PM IST

    • T Natarajan Cricket Ground : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज टी नटराजन याने तामिळनाडूमधील चिन्नाप्पमपट्टी गावात क्रिकेट स्टेडियम बांधले आहे. या मैदानावर तो लहान मुले आणि युवा खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे.
T Natarajan Cricket Ground

T Natarajan Cricket Ground : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज टी नटराजन याने तामिळनाडूमधील चिन्नाप्पमपट्टी गावात क्रिकेट स्टेडियम बांधले आहे. या मैदानावर तो लहान मुले आणि युवा खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे.

    • T Natarajan Cricket Ground : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज टी नटराजन याने तामिळनाडूमधील चिन्नाप्पमपट्टी गावात क्रिकेट स्टेडियम बांधले आहे. या मैदानावर तो लहान मुले आणि युवा खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे.

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज टी नटराजनने त्याच्या गावात स्वतःचे क्रिकेट स्टेडियम बनवले आहे. आपल्या गावात लहान मुले आणि युवा खेळाडूंसाठी मैदान बनवण्याचे नटराजन आणि त्याच्या प्रशिक्षकाचे स्वप्न होते. आता नटराजनने स्वतःचे आणि प्रशिक्षकाचे हे स्वप्न साकार केले आहे. शुक्रवारी (२३ जून) नटराजनच्या या मैदानाचे उद्घाटन झाले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिक मैदानाच्या उद्घाटनासाठी पोहोचला होता. कार्तिकने रिबन कापून स्टेडियमचे उद्घाटन केले. नटराजनने हे स्टेडियम सालेम जिल्ह्यातील त्याच्या चिन्नमपट्टी गावात बांधले आहे. मैदानाच्या उद्घाटन सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दिनेश कार्तिक आणि टी नटराजन यांच्यासोबत गुजरात टायटन्सचा खेळाडू साई किशोर देखील या उद्धाटन सोहळ्याला उपस्थित होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नटरानजनच्या या मैदानावर एकूण ४ खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत. याशिवाय येथे जिम आणि कॅन्टीनची सुविधाही उपलब्ध आहे. त्याचबरोबर मैदानात १०० आसनक्षमतेचा स्टँडही तयार करण्यात आला आहे, जिथे लोक बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतील. टी नटराजन स्वतः येथील युवा खेळाडू आणि मुलांना प्रशिक्षण देणार आहे.

उद्घाटन समारंभास या लोकांची उपस्थिती

मैदानाच्या उद्घाटन समारंभाला तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पी. अशोक सिगामणी आणि अभिनेता योगी बाबू यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती हे भारतीय खेळाडूही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

नटराजन भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे

डिसेंबर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत १ कसोटी, २ एकदिवसीय आणि ४ टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात ३-३ विकेट्स आणि टी-20 मध्ये ७ विकेट घेतल्या आहेत. मार्च २०२१ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तो २ वर्षांहून अधिक काळ संघाबाहेर आहे. टी नटराजन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो.

पुढील बातम्या