मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Suryakumar yadav : सूर्यकुमार यादवचा धडाका! सर्वाधिक धावांच्या बाबतीत शिखर धवनला मागे टाकले

Suryakumar yadav : सूर्यकुमार यादवचा धडाका! सर्वाधिक धावांच्या बाबतीत शिखर धवनला मागे टाकले

Aug 09, 2023, 01:30 PM IST

  • suryakumar yadav T20 runs records : भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव यानं टी-२० क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करत शिखर धवन यांना मागे टाकलं आहे.

Suryakumar Yadav

suryakumar yadav T20 runs records : भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव यानं टी-२० क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करत शिखर धवन यांना मागे टाकलं आहे.

  • suryakumar yadav T20 runs records : भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव यानं टी-२० क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करत शिखर धवन यांना मागे टाकलं आहे.

suryakumar yadav surpasses shikhar dhawan : टी-२० क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या सूर्यकुमार यादव यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवनं टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील धावांच्या बाबतीत शिखर धवनला मागे टाकलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा टी-२० सामना काल गयानाच्या मैदानावर झाला. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं ४४ चेंडूत ८३ धावांची धडाकेबाज खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं १० चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. त्याचं शतक काही धावांसाठी हुकलं असलं तरी या खेळीमुळं सूर्यकुमारनं टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत शिखर धवनला मागे टाकलं आहे. २०२२ या कॅलेंडर वर्षात टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सूर्यकुमार दुसऱ्या स्थानी होता.

शिखर धवननं भारताकडून खेळताना ६८ टी-२० सामन्यांमध्ये १७५९ धावा केल्या आहेत. सूर्यकुमारनं ५१ सामन्यांमध्ये १७८० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, कालच्या ८३ धावांच्या खेळीनंतर सूर्यकुमार हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

कोणाच्या नावावर किती धावा?

माजी कर्णधार विराट कोहली यानं टी-२० मध्ये ४ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे रोहित शर्मा आणि केएल राहुल हे आहेत. विराटनं ११५ सामन्यांमध्ये ४,००८ धावा केल्या आहेत. रोहितनं १४८ सामन्यात ३,८५३ धावा केल्या आहेत. तर, केएल राहुलनं ७२ सामन्यांत २,२६५ धावा केल्या आहेत.

वेगवान १०० षटकारांमध्ये पहिला नंबर

सूर्यकुमारनं १४ मार्च २०२१ रोजी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगानं १०० षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. अवघ्या ५० सामन्यांमध्ये त्यानं हा विक्रम केलाय. रोहितनं ९२ तर कोहलीनं १०४ सामन्यांमध्ये १०० षटकार ठोकले आहेत.

पुढील बातम्या