मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sunil Chhetri Birthday : सुनील छेत्रीला फुटबॉलपटू बनायचं नव्हतं, पण ‘या’ कारणामुळे खेळावं लागायचं, पाहा

Sunil Chhetri Birthday : सुनील छेत्रीला फुटबॉलपटू बनायचं नव्हतं, पण ‘या’ कारणामुळे खेळावं लागायचं, पाहा

Aug 03, 2023, 01:22 PM IST

    • sunil chhetri birthday : सुनील छेत्रीबद्दल एक मनोरंजक गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे, ती म्हणजे त्याला कधीही व्यावसायिक फुटबॉलपटू बनायचे नव्हते. स्पोर्ट्स कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तो हौशी म्हणून फुटबॉल खेळायचा.
sunil chhetri birthday

sunil chhetri birthday : सुनील छेत्रीबद्दल एक मनोरंजक गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे, ती म्हणजे त्याला कधीही व्यावसायिक फुटबॉलपटू बनायचे नव्हते. स्पोर्ट्स कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तो हौशी म्हणून फुटबॉल खेळायचा.

    • sunil chhetri birthday : सुनील छेत्रीबद्दल एक मनोरंजक गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे, ती म्हणजे त्याला कधीही व्यावसायिक फुटबॉलपटू बनायचे नव्हते. स्पोर्ट्स कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तो हौशी म्हणून फुटबॉल खेळायचा.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आज (३ ऑगस्ट) ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. छेत्री हा भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा आणि गोल करणारा फुटबॉलपटू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

छेत्रीचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ रोजी सिकंदराबाद येथे झाला. सुनीलचे वडील केबी छेत्री भारतीय सैन्य संघात खेळले, तर आई सुशीला छेत्री तिच्या जुळ्या बहिणीसह नेपाळच्या राष्ट्रीय संघाकडून फुटबॉल खेळले आहे. छेत्रीचे लग्न सोनम भट्टाचार्यशी झाले आहे. सोनम ही त्याच्या प्रशिक्षकाची मुलगी आहे. 

सुनील छेत्रीला देशाच्या अनेक भागात राहण्याची संधी मिळाली

सुनील छेत्रीचे वडील लष्करात होते, त्यामुळे ते देशाच्या अनेक भागात राहत होते. सुनील छेत्रीने गंगटोकमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याने कोलकात्यातही शिक्षण घेतले आणि १२वी नंतर त्याने शिक्षण सोडले कारण त्यानंतर त्याची फुटबॉल कारकीर्द जोमात आली होती.

छेत्रीला फुटबॉलपटू व्हायचे नव्हते

सुनील छेत्रीबद्दल एक मनोरंजक गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे, ती म्हणजे त्याला कधीही व्यावसायिक फुटबॉलपटू बनायचे नव्हते. स्पोर्ट्स कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तो हौशी म्हणून फुटबॉल खेळायचा, अशी कबुली खुद्द छेत्रीने दिली होती. पण त्याच्या सुरुवातीच्या प्रशिक्षकानेच त्याला फुटबॉलपटू बनण्याची प्रेरणा दिली.

जेव्हा प्रशिक्षकाने अपमान केला होता

सुनील छेत्रीला त्याच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. आज जरी छेत्री हा भारतीय फुटबॉलचा स्टार असला तरी एक काळ असा होता जेव्हा त्याला संघातील एक अपयशी खेळाडू म्हणून संबोधले जात असे. सुनील छेत्री २०१२ मध्ये पोर्तुगालच्या स्पोर्टिंग लिस्बन क्लबमध्ये सामील झाला तेव्हा त्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाने त्याचा अपमान केला होता. 

सुनील छेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रशिक्षकाने त्याला अ संघातून ब संघात पाठवण्यास सांगितले होते. सुनील छेत्री ९ महिने या क्लबशी संलग्न होता ज्यामध्ये त्याला फक्त ५ सामने खेळण्याची संधी मिळाली. छेत्री २०१० मध्ये अमेरिकेच्या कॅन्सस सिटी विझार्ड्सशी देखील जुडला होता, पण तो एका वर्षातच भारतात परतला. भारतीय राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त, छेत्री त्याच्या कारकिर्दीत मोहन बागान, बेंगळुरू एफसीकडूनही खेळला आहे.

फुटबॉलमध्ये अनेक मोठे विक्रम नोंदवणाऱ्या छेत्रीने २००५ साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने या खेळात भारताचा झेंडा जगभर फडकवला. सुनील छेत्रीचे उत्कृष्ट रेकॉर्ड फुटबॉल खेळाप्रती त्याचे समर्पण आणि कठोर परिश्रम दर्शवतात. 

हे पुरस्कार मिळाले आहेत

सुनील छेत्रीला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये पद्मश्री (२०१९), अर्जुन पुरस्कार (२०११) आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (२०२१ ) यांचा समावेश आहे.

पुढील बातम्या