मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC Final : तीन चेंडूत भारताचा खेळ खल्लास! स्टीव्ह स्मिथनं पकडला कोहलीचा अप्रतिम झेल

WTC Final : तीन चेंडूत भारताचा खेळ खल्लास! स्टीव्ह स्मिथनं पकडला कोहलीचा अप्रतिम झेल

Jun 11, 2023, 04:23 PM IST

    • wtc final ind vs aus day 5 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पाचव्या दिवशी भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. आधी विराट कोहली आणि नंतर रवींद्र जडेजाबाद झाले. स्कॉट बोलंडने तीन चेंडूत टीम इंडियाचे दोन फलंदाज तंबूत पाठवले. भारतासमोर विजयासाठी ४४४ धावांचे लक्ष्य आहे.
wtc final ind vs aus (twitter)

wtc final ind vs aus day 5 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पाचव्या दिवशी भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. आधी विराट कोहली आणि नंतर रवींद्र जडेजाबाद झाले. स्कॉट बोलंडने तीन चेंडूत टीम इंडियाचे दोन फलंदाज तंबूत पाठवले. भारतासमोर विजयासाठी ४४४ धावांचे लक्ष्य आहे.

    • wtc final ind vs aus day 5 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पाचव्या दिवशी भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. आधी विराट कोहली आणि नंतर रवींद्र जडेजाबाद झाले. स्कॉट बोलंडने तीन चेंडूत टीम इंडियाचे दोन फलंदाज तंबूत पाठवले. भारतासमोर विजयासाठी ४४४ धावांचे लक्ष्य आहे.

steve smith takes virat kohli catch wtc final : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी २८० धावांची गरज होती. तर ऑस्ट्रेलियाला ७ विकेट्सची गरज होती. भारताचे दोन सेट फलंदाज विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे क्रीजवर होते. चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात दोघांनी चांगली फलंदाजी केली होती. पाचव्या दिवशीही त्यांची सुरुवात चांगली झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

स्मिथने पकडला अप्रतिम झेल

विराट कोहली खेळपट्टीवर सेट होऊन मोठ्या खेळीच्या दिशेने वाटचाल करत होता. पण स्टीव्ह स्मिथच्या एक अप्रतिम झेलने त्याचा डाव संपुष्टात आला. भारताच्या डावाचे ४७वे षटक स्कॉट बोलँड करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराटने कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन दुसऱ्या स्लिपच्या उजवीकडे गेला. तेथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या स्मिथने हवेत झेप घेत थरारक झेल टिपला. विराटने ७८ चेंडूत ४९ धावांची खेळी खेळली. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले.

जडेजा केवळ एक चेंडूच टिकला

रवींद्र जडेजाने गेल्या काही वर्षांत कसोटीत अप्रतिम इनिंग खेळल्या आहेत. धावा करण्यात तो आघाडीच्या फलंदाजांना टक्कर देतो. या सामन्यातही त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र या सामन्यात तो अपयशी ठरला. एक चेंडू खेळून स्कॉट बोलंडने त्याला विकेटकीपर अॅलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले. जडेजाने पहिला चेंडू सोडला पण दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या अगदी जवळ होता. हा चेंडू बॅटची बाहेरील कड घेत चेंडू यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हातात गेला. रवींद्रला खातेही उघडता आले नाही.

पुढील बातम्या